The mother-wife of a corona-positive patient in Nimon was also affected 
अहिल्यानगर

निमोणमधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची आई-पत्नीही बाधित

सकाळ वृत्तसेवा

नगर - संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. १९ मे रोजी निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधित आढळून आली होती. त्याची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ७४ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

दरम्यान, अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील एका व्यक्तीचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीला अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अाहे. त्याची येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये पुन्हा स्त्राव तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

दिनांक १९ मे रोजी नाशिक येथे बाधित आढळलेला रुग्ण हा मुळचा निमोण येथील आहे. त्याची आई आणि पत्नी यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील व्यक्ती मुंबईहून गावी आली होती. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. दहा दिवस झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी हॉस्पिटलमधून घशातील स्त्राव चाचणी खाजगी प्रयोगशाळेतून करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, स्त्राव चाचणी नमुना घेताना योग्य ते निर्देश पाळले गेले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर रुग्णास जिल्हा रुग्णालयात दाखल केले अाहे. त्याची पुन्हा स्त्राव चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे  आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT