MP Dr. Sujay Vikhe Patil has informed that about Rs. 400 crore has been sanctioned by the Center for Adhalgaon Jamkhed road.jpg 
अहिल्यानगर

आढळगाव जामखेड रस्त्यासाठी केंद्राकडून चारशे कोटींचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते प्रकल्पांसाठी भरघोस निधीचा धडाका कायम राखला आहे. नगर उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता, नगर मनमाड या रस्त्यावर बरोबरच आता न्हवरा फाटा ते जामखेड ह्यातील टप्पा दोन म्हणजे आढळगाव ते जामखेड (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561) यासाठी सुमारे 399 कोटी म्हणजे जवळपास 400 कोटी भरघोस तरतूद केल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी ट्विटरद्वारे नुकतीच दिली आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण संपर्कात होतो. अहमदनगर येथील उड्डाणपूल, नगर शिर्डी रस्ता या बरोबरच कर्जत-जामखेड या तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार न्हवरा फाटा जामखेड टप्पा 2 या रस्त्याच्या कामासंदर्भात मागील काही आठवड्यात केंद्रीय वाहतूक आणि रस्ते महामार्ग मंत्री वाहतूक मंत्री महोदय यांच्या संपर्कात होतो. न्हवरा फाटा ते श्रीगोंदा काष्टी टप्पा 1  कामाची मंजुरी मिळालेली आहे. त्याचे काम यापूर्वीच सुरू झाले असून ते काम प्रगतिपथावर आहे .  आता केंद्रीय वाहतूक रस्ते महामंत्री नितीनजी गडकरी यांनी भाग 2 ची मंजुरी दिल्यामुळे आढळगाव ते जामखेड या कामाची लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गसाठी भरपूर दिल्यामुळे आपण अहमदनगर जिल्ह्यातील जनतेच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे ऋण व्यक्त करतो आणि प्रगतीचा हायवे अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक वाडी-वस्ती पर्यंत पोहोचेल ,असे देखील खासदार डॉ. सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT