अहमदनगर

नगर महापालिकेने नियम तोडणाऱ्यांना शिकवला धडा

अमित आवारी

नगर ः महापालिका दक्षता पथकांतर्फे शहरात कोरोनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर सहा लाख ६३ हजार ७०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.

नगर महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समितीनिहाय चार कोरोना दक्षता पथके स्थापन केली. यात शशिकांत नजान, परिमल निकम, संतोष लांडगे, कल्याण बल्लाळ यांच्याकडे दक्षता पथकप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. १६ मार्चला स्थापन झालेल्या कोरोना दक्षता पथकांनी सहा जूनपर्यंत कारवाईचा धडाका लावला. (Municipal Corporation fined those violating the rules)

कोरोना नियम मोडणाऱ्या ५४५ आस्थापना व नागरिक यांच्यावर सहा लाख ६३ हजार ७०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरातील भाजी बाजार, मुख्य व उपनगर बाजारपेठा येथे कोरोना नियमावलीच्या कडक अंमलबजावणीसाठी दक्षता पथक सहायक सूर्यभान देवघडे, राहुल साबळे, नंदकुमार नेमाणे, भास्कर आकुबत्तीन, राजेश आनंद, अमोल लहारे, किशोर जाधव यांनी परिश्रम घेतले. त्यांना सहायक आयुक्त दिनेश सिनारे, प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर, अंबादास सोनावणे, मार्केट विभागप्रमुख रमेश वाळेकर, राहुल तनपुरे व अतिक्रमणविरोधी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच, शहर आणि उपनगर भागातील मुख्य चौक, भाजी बाजार येथील गर्दीचे नियंत्रण आणि कोरोना नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी राजेंद्र बोरुडे, विजय नवले, बापू बेलेकर, नंदकुमार रोहोकले, प्रशांत आंबेकर, राजू गोरे, शैलेश दुबे आदींनी परिश्रम घेतले.

कोरोना महामारीच्या काळात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, शहरातील नागरिक या आजारापासून सुरक्षित राहावेत, यासाठी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी होण्याकरिता स्थापन झालेल्या पथकांनी नागरिक व महापालिका यांच्यात महापालिका आयुक्त, उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाचेदेखील काम केले.

- शशिकांत नजान, दक्षता पथक क्रमांक दोनचे प्रमुख(Municipal Corporation fined those violating the rules)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT