amc nagar 
अहिल्यानगर

महापालिकेची स्थायी समिती सभा होणार ऑनलाईन 

अमित आवारी

नगर : शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बैठका ऑनलाईन होत आहेत. हा कित्ता आता महापालिकेलाही गिरवावा लागणार आहे. गेली चार महिन्यांपासून महापालिकेतील एकही महत्त्वाची सभा झाली नाही. शहरातील अनेक विकास कामे मंजुरी अभावी पडून आहेत. राज्य शासनाने 3 जुलैला आदेश काढून सर्व महापालिकांना ऑनलाईन सभा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार अहमदनगर महापालिकेची स्थायी समितीची सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय निश्‍चित करण्यात आला आहे. अहमदनगर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा ऑनलाईन होणार आहे. 

देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 23 मार्चपासून लॉकडाउन केला आहे. गेली 15 दिवसांपासून लॉकडाउनमध्ये केंद्र व राज्य शासनाने शिथिलता आणली आहे. या चार महिन्यांत महापालिकेला करायची अनेक विकास कामे, त्यांच्या मंजुऱ्या घेणे बाकी होते. मात्र लॉकडाउनमुळे अनेक विकास कामांना मंजुरी मिळाली नाही. महापालिकेचा अर्थसंकल्पही कोरोनामुळे महासभेकडून मंजूर झालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या विविध सभा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात याव्यात अशी मागणी होत होती. त्यानुसार राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी आदेश काढून महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायतीच्या सर्वसाधारण व विविध विषय समित्यांची सभा ऑनलाईन घेण्यास परवानगी दिली. ही परवानगी मिळताच अहमदनगर महापालिकेतून सर्वसाधारण सभा व स्थायी समितीची ऑनलाईन सभा बोलावण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांना ऑनलाईन सभा बोलावण्याची मागणी केली होती. 

त्यानुसार स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांनीही ऑनलाईन स्थायी समितीची सभा घ्यावी अशी मागणी केली. आज महापालिकेच्या नगरसचिव विभागाने स्थायी समितीची ऑनलाईन सभा घेण्याचा निर्णय घेतला. स्थायी समितीची ऑनलाईन सभा 21 जुलैला दुपारी एक वाजता होणार आहे. या सभेत 21 विषयांवर चर्चा होणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत केवळ आठच सदस्य आहेत. त्यामुळेही सभा ऑनलाईन होणे शक्‍य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prateek Yadav PM Report : मुलायसिंग यांचा मुलगा प्रतिक यादववर विषप्रयोगाचा संशय? पोस्ट मार्टम रिपोर्ट आला; फुफ्फुसांचे काम अचानक बंद

RPI Leader Killed : पुणे हादरलं! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या; पिंपरी-चिंचवडमध्ये तणावाचं वातावरण, मोशीतील 'त्या' हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुण्यात सुखसागरनगरमधील जुन्या गोदामाला लागली आग!

Chhatrapati Sambhajinagar: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश; हाती आले २ हजार, खर्च मात्र २९००; संतप्त होऊन भरउन्हात रस्त्यावर फेकले कांदे

Stock Market Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी! मात्र या IT शेअर्सला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT