नगर : पत्त्याच्या डावातील दीडशे रुपये काढून घेतल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून आरोपीने एकाच्या छातीत बुक्का मारला अन् त्याचा जीव गेला.
या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. सचिन भोजने असे आरोपीचे नाव आहे. तर, नंदकिशोर मंचरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा - डिझेलचा टँकर उलटला अन फुकटे धावले भांडी घेऊन
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये तगडवस्ती, ढवणवस्ती परिसरात मोकळ्या भूखंडामध्ये नेहमीच जुगाराचे डाव रंगतात. काल तागडवस्ती येथील एका कंपाउंडमध्ये मोकळ्या जागेत जांभळीच्या झाडाखाली पत्त्याचा डाव रंगाला होता. यावेळी आरोपी सचिन भोजने याने डावातील दीडशे रुपये काढून घेतले. त्याचा जाब विचारला म्हणून त्याने नंदकिशोर मंचरे याच्या छातीत बुक्का मारला आणि कोपराने जोरात मारले.
वर्मी घाव लागल्याने नंदकिशोर मंचरे याचा जागीच जीव गेला. याबाबत मंगल नंदकिशोर मंचरे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सचिन भोजनेसह अन्य चार लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आरोपी सचिन भोजने याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवस (ता. 20) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.