Murder of one in Shrigonda taluka 
अहिल्यानगर

ब्रेकिंग ः दुचाकीला आला आडवा... दोन भावांनी कायमचाच केला आडवा

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : किरकोळ भांडण कोणत्या थराला घेऊन जाऊन सांगता येत नाही. थुंकल्यामुळे खून, कट मारल्यानेमुळे हाफ मर्डर अशा घटना सातत्याने घडत असतात. अशाच प्रकाररची घटना तालुक्यातील घोगरगावात घडली.

बियाणे खरेदी करण्यासाठी गावात गेलेले शेतकरी सुनील माणिक तरटे (वय 46) यांचा दोन भावांनी चौकातच खून केल्याची घटना घडली. घोगरगाव येथे आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. 

या प्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी रोहित रमेश तरटे (वय 27) व शुभम रमेश तरटे (वय 25) या दोघा भावांच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार आहेत. या बाबत पोलिस निरीक्षक दौलत जाधव म्हणाले, आज सकाळी बियाणे खरेदी करण्यासाठी मयत सुनील तरटे हे घोगरगाव येथे आले होते.

ते चौकातील रस्त्यातून जात असताना आरोपी रोहित व शुभम तरटे हे दोन मोटारसायकलींवरुन तेथून चालले होते. त्यावेळी मयत तरटे त्यांच्या दुचाकींना आडवे गेले. त्यावेळी दोघा आरोपींनी मयताला उद्देशून शिवी दिली. त्यावर मयताने त्यांना उत्तर दिले.

या तिघांचा यात वाद झाला व नंतर भांडण सुरु झाले. त्याचवेळी आरोपींनी मयत सुनील तरटे यांच्या गुप्तांगावर लाथ मारल्याने ते खाली कोसळले. परत उठू लागले असता आरोपींनी त्यांच्या छातीवर लाथा मारल्याने ते जोरात रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर जखम झाली. आणि त्यातच ते जागीच मरण पावले. 

या प्रकरणी सुनील तरटे यांच्या खून प्रकरणी रोहित व शुभम तरटे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला अाहे. आरोपींचा तपास सुरु आहे. 

अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT