Murder of Shrigonda farmer due to immoral relationship 
अहिल्यानगर

समजून सांग... त्याने संपवूनच टाकले, श्रीगोंद्यातील खुनाचा लागला छडा

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद वाकडे खून प्रकरणाचा उलगडा होत आहे. आज पोलिसांनी त्याच गावातील एका जणाला शिताफीने ताब्यात घेतले. ही हत्या नाजूक कारणातूच झाली आहे.

आढळगाव येथील मुकुंद वाकडे या तरुण शेतकऱ्याचा अतिशय निर्दयपणे खून झाला होता. ज्या पद्धतीने हा खून झाला त्यावरून पोलिसांनी तपास फिरवला.

गुन्हे अन्वेषण विभाग व श्रीगोंदा पोलिसांनी शांतपणे हा गुन्ह्याचा तपास हाताळत यातील एक आरोपी ताब्यात घेतला आहे. सद्या ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू हस्तगत करण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

दरम्यान, मयत मुकुंद वाकडे याच्या खून प्रकरणात नेमके किती आरोपी आहेत. याचा शोध लागणार असला तरी या सगळ्या प्रकरणाला नाजूक किनार आहे.

मृत मुकुंदच्या गुप्तांगावरही वार करण्यात आले होते. अनैतिक संबंधाच्या रागातूनच हे हत्याकांड झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरूणानेच मुकुंदचा काटा काढला. तो तरूण मकुंदचे पार्थिव उचलताना मदत करायलाही हजर होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने हा पवित्रा घेतला असल्याचे समोर येत आहे.

समजून सांग.. कॉल कोणाचा

मुकुंदला समजन सांग, असा कॉल त्या ताब्यात घेतलेल्या तरूणाला आला होता. तो नेमका कोणाचा होता. कोणत्या कारणासाठी समजून सांग, असे म्हणत असावी ती व्यक्ती याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT