The mystery of the girl's death in Dongaon grew
The mystery of the girl's death in Dongaon grew 
अहमदनगर

कोपर्डीच्या पुनरावृत्तीची चर्चा...डोणगावातील मुलीच्या मृत्यूचे गूढ वाढले

सकाळ वृत्तसेवा

जामखेड : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डोणगाव येथील बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिचा खून झाला की आत्महत्या आहे याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. काहीजण ही कोपर्डीची पुनरावृत्ती असल्याची चर्चा करीत आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्‍यातील रत्नापूर येथील अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी डोणगाव येथे आजोळी होती. अरणगाव येथे बारावीमध्ये शिकत होती. ती मुलगी गुरुवारी (ता. 18) डोणगाव येथून सायंकाळी बेपत्ता होती.

त्यामुळे नातेवाईकांनी रात्रभर तीचा शोध घेतला. पण, तिचा शोध न लागल्याने आजोबांनी शुक्रवारी (ता.19) जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिसऱ्या दिवशी शनिवारी तिचा मृतदेह डोणगाव येथील घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील किन्हीचा ओढा येथील विहिरीत आढळून आला.

पोलिस पाटील बिभीषण यादव यांनी घटना जामखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना कळविली. पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

या नंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. 
दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले अाहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. पीडित मुलीच्या मृत्यूबाबत शंका उपस्थिती केली जात आहे. कोपर्डी घटनेची पनरावृत्ती झाली काय? अशी शंका अनेकांना आली अाहे. तशी चर्चा तालुक्‍यात सुरू होती. पोलिस अधिकारी विविध अंगाने घटनेची चौकशी करीत आहेत. वैद्यकीय अहवालात पीडित मुलीच्या मृत्यूचे कारण समजणार आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT