जळीतकांड प्रकरण sakal
अहिल्यानगर

जळीतकांड प्रकरण : कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईचे फुटेजमध्ये भक्कम पुरावे

पोलिस अधीक्षक पाटील यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागली तेव्हा कर्तव्यावर असूनही चार जण तेथे नव्हते, याचे भक्कम पुरावे सीसीटीव्हीमध्ये मिळाले आहेत. त्यामुळेच चार जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत या चौघींना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य कामगारांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी ही माहिती दिली.

पाटील म्हणाले, ‘‘या विभागात ज्यांची नियुक्‍ती होती, त्यांनी आपल्या नियुक्‍तीच्या ठिकाणी हजर राहणे आवश्‍यक होते. त्यांनी आपली जबाबदारी टाळली. हा निष्काळजीपणा सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या भक्कम पुराव्यांमुळेच चौघींना अटक केली आहे. इतर रुग्णांवर उपचार करीत असल्याचे सांगितले. मात्र, सर्वांच्या जबाबातही विसंगती आढळली.

अर्धा तास डॉक्टर नव्हता; कर्मचाऱ्यांचे चहापान

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर सुरवातीची १५ मिनिटे रुग्ण वगळता एकही डॉक्‍टर किंवा कर्मचारी या विभागात नव्हता. तब्बल २५ मिनिटांनी या विभागात नियुक्तीला असलेले डॉक्‍टर आणि परिचारिका आल्या. उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांनी आत जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; पण नंतर कोणीही आत गेले नाही. काही कर्मचारी तर बाहेर चहा घेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आजचा भारत दहशतवाद सहन करत नाही’; ‘मन की बात’मधून PM मोदींचा थेट संदेश, नेमकं काय म्हणाले?

Bandhavgarh Elephant Festival: बांधवगड हत्ती महोत्सवात चिमुकल्या ‘कृष्णा’ची हवा; खोडकर खेळांनी जिंकली पर्यटकांची मने! काय आहे मुख्यमंत्र्यांशी कनेक्शन ?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

Child Safety Policy: शाळांमध्ये ‘स्मार्ट फोन’ बंदीची शिफारस,‘बिहेविअर चेंज’चा अहवाल; डिजिटल माध्यम वापरासाठी धोरणाचा आग्रह

SCROLL FOR NEXT