Nagar
Nagar Sakal
अहमदनगर

Nagar: अमेरिकेत घुमणार नगरी ढोलचा आवाज; गणेशोत्सवासाठी ताशा, झांजांनाही मागणी

अशोक निंबाळकर

अहमदनगर - अमेरिकेत आवाज कुणाचा, नगरी ढोलाचा... यंदा देशासह परदेशात नगरी वाद्यांचा निनाद घुमणार आहे. येत्या गणेशोत्सवात तो ऐकायला मिळेल. तेथील गणेशभक्तांनी नगरी ढोलासह, ताशा आणि झांजांना पसंती दिली आहे. या आठवड्यात ही पारंपरिक वाद्य विमानाने रवाना केली जातील. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये या वाद्यांचा आवाज घुमला होता.

येथील बापूराव भिकोबा गुरव या फर्मने वाद्यांच्या माध्यमातून नगरचे नाव सातासुमद्रापार नेले. कोणत्याही उत्सवात नगरी वाद्यांचाच बोलबाला दिसतो. गेल्या चार पिढ्यांपासून गुरव यांनी हा विश्वास जिंकला आहे. अमेरिकेतील कॅलिफॉर्निया प्रांतात मराठी बांधव ही वाद्य वाजवून गणेशोत्सव साजरा करणार आहेत.

महाराष्ट्रात विविध भागांत त्यांनी या वाद्यांची चौकशी केली. परंतु नगरी वाद्ये त्यांना भावली. त्यामुळेच त्यांनी तब्बल ४० ढोल, २० ताशे, १० झांजांच्या जोडाची ऑर्डर येथील गुरव फर्मला दिली आहे. मागील वर्षी इंग्लंडमधील मराठी मंडळाला नगरी वाद्याने भुरळ घातली होती.

या आठवड्यात ही वाद्ये कॅलिफॉर्नियाला विमानाने पाठवली जाणार आहेत. त्याच्या पॅकिंगचे काम सुरू आहे. तेथे गणेशोत्सवात बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी तसेच विसर्जनावेळीही मिरवणूक काढणार आहेत.

भारतात केरळपासून लेह-लडाखपर्यंत नगरी वाद्य जातात. गुरव यांच्यासोबत इतरही दुकाने वाद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पंढरीच्या वारीसाठीही नगरमधून टाळ, मृदंगाची खरेदी होते. वारकरीही नगरी वाद्यांवर खूश असतात. गुणवत्तेमुळे हरिनाम सप्ताहासह इतर धार्मिक कार्यक्रमांतही नगरी वाद्येच दिसतात.

वैशिष्ट्ये काय

येथील बापूराव भिकोबा गुरव ही फर्म गेल्या चार पिढ्यांपासून वाद्यांवर काम करते. हे महाराष्ट्रातील सर्वांत जुने दुकान आहे. ते स्वतः चमड्याची वाद्य बनवतात. त्यामुळे आवाजाचा गोडवा टिकून आहे. इतरांपेक्षा टिकाऊ आणि स्वस्त वाद्य असल्याने त्याला देशभर पसंती आहे. आता परदेशातूनही मागणी येऊ लागलीय. ढोलपथकांनाही नगरी ढोल आवडतात.

नाशिकलाही नगरी ढोल

महाराष्ट्रात नाशिक ढोल प्रसिद्ध आहे. पुण्याच्या ढोलपथकांनीही तरूणाईला वेड लावले आहे. नगरमध्येही ढोलपथके सुरू झालीत. ढोलांचे कोणतेही प्रकार असले तरी नगरमध्ये बनणाऱ्या ढोल-ताशांना जास्त मागणी आहे. नाशिकमधील अनेक पथके नगरला ढोल बनवून घेतात. अगदी केरळपासून लेह-लडाखपर्यंतचे गणेश भक्त नगरी वाद्यांना पसंती देतात.

बापूराव भिकोबा गुरव महाराष्ट्रातील सर्वांत जुने दुकान आहे. राज्यातील किमान ३२ जिल्ह्यांतून गणेश मंडळांसह भाविक वाद्यखरेदीस येतात. गुणवत्ता टिकवून ठेवल्यानेच आता परदेशातून मागणी होत आहे. हा खरे तर नगरकरांचा सन्मान आहे.

- देवदत्त गुरव, वाद्यविक्रेते, नगर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT