Nagar Zilla Parishad also seals two divisions 
अहिल्यानगर

नगर जिल्हा परिषदेतही घुसला कोरोना, दोन विभाग सील

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगर जिल्ह्यात कोरोनाने फास आवळला आहे. दररोज नवीन रूग्ण सापडत आहेत. परंतु सरकारी कार्यालांनाही बाधा होत आहे. पोलिस कर्मचारी, महापालिका आणि जिल्हा परिषदही बाधली आहे.

जिल्हा परिषदेत एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या दालनाशेजारील कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकारी व त्याचे सहकारी कर्मचारी धास्तावले आहेत. त्या कर्मचाऱ्याच्या निकट संपर्कात दोन कर्मचारी आहेत. परंतु पदाधिकारीही आले आहेत.त्यामुळे सर्वाच्याच मनात भीती दाटली आहे. आपलाही स्वॅब द्यावा की क्वारंटाइन व्हावे, असा संभ्रम त्यांच्या मनात आहे. संबंधित कर्मचारी बाधित निघाल्याने संपर्कातील अनेकांनी तर मोबाईलच बंद करून ठेवले.

प्रमुख पदाधिकाऱ्याच्या दालनाशेजारीच हा कर्मचारी बसतो. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्याकडे येणाऱ्या लोकांच्याही तो संपर्कात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नेमक्या किती लोकांना त्याने बाधित केले होते तपासणीनंतरच समजेल.

त्याच्या निकट संपर्कातील दोन लोकांना तपासणीसाठी पाठवले आहे. त्यांच्या स्वॅबकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित कर्मचारी बाधित आढळल्यानंतर जिल्हा परिषदेतील गर्दी हटली. सर्वच दालनात शुकशुकाट झाला. पदाधिकारीही जिल्हा परिषद आवारात फिरकेना झाले आहेत. संबंधित कर्मचारी जेथेबसतो त्या शेजारील दोन विभाग सील करण्यात आले आहे.

हा कर्मचारी रजेवर होता. चार दिवसांपूर्वीच तो पुन्हा रूजू झाला होता. नंतर त्रास जाणवू लागल्याने त्याचा स्वॅब घेण्यात आला.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ठरलं तर मग' मधून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट? अनेक दिवसांपासून मालिकेतून आहे गायब, म्हणाली- तिथे...

Ram Navami 2026 horoscope: 'या' राशींच्या लोकांना रामनवमीच्या दिवशी होईल फायदा, करिअर अन् व्यवसायात चांगली बातमी मिळेल

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची SIT कडून सलग सातव्या दिवशी चौकशी

Cold Storage Blas: ड्यूप्लिकेट वीरप्पनला अटक! कोल्ड स्टोरेज स्फोटात योगी सरकारची मोठी कारवाई , कोण आहे माजी आमदार अन्सार अहमद

Firozabad to Kolhapur : काकणाचा चुडा, सौभाग्याचं लेणं; बांगड्यांच्या व्यापाराला कोल्हापुरात मोठी मागणी

SCROLL FOR NEXT