अहिल्यानगर

अहमदनगर : ‘नवोदय’ ने विलगीकरणातील २२६ विद्यार्थी सोडले

‘नवोदय’च्या निर्णयामुळे पालकांनी सोडला सुस्कारा

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील(parner taluka) टाकळी ढोकेश्वरमधील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील(navoday school) गेल्या 12 दिवसांपासून विलगीकरण(Quarantine) केलेल्या 226 मुलांना घरी सोडण्यात आले. विद्यालयात राबविलेल्या कोविड नियमांचे पालकाकडून स्वागत करण्यात आले.नवोदयमध्ये कोरोना बाधित विद्यार्थी आढळून आल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पालक चिंतातूर होते. दररोज बाधित मुले आढळत असल्याने पालकांनी मुलांना घरी सोडण्याची मागणी केली होती. यातील 310 मुलांचे विलगीकरण करण्यात आले होते.

मुलांना आम्ही विलगीकरणात ठेऊ. प्रशासन त्यांची काळजी घेत नाही, असेही आरोप त्यावेळी पालकांकडून करण्यात आले. मात्र, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सतीश लोंढे यांसह विद्यालय प्रशासनाने मुलांची योग्यरीत्या काळजी घेत विलगीकरण कक्षाची पाणी पिण्याची स्वतंत्र व्यवस्थेसह इतर बाबींची लक्षपूर्वक काळजी घेतली. कोविडमधील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मुलांना सोडण्यात आले.

पालकांनादेखील वेळोवेळी याची माहिती देण्यात आली. त्यामुळे हा संसर्ग इतर ठिकाणी वाढला नाही. यातील दहावी व बारावीतील मुलांची कोविड चाचणीसह विलगीकरणातील दिवस संपले असल्याने त्यांचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. विलगीकरणातील मुले ही घरून परत विद्यालयात आल्यानंतर त्यांची कोविड चाचणी करूनच आत प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाइन वर्गांना पालकांना नकार आल्याने या मुलांचे वर्गही पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहेत. पारनेर ग्रामीण रुग्णालयातील एकूण 45 मुलांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित 38 मुलांना लवकरच सोडण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: भारताच्या माजी क्रिकेटरचे रोहित पवारांवर गंभीर आरोप, क्रिकेट जगतात खळबळ! नेमकं प्रकरण काय?

सुधा चंद्रन यांच्या अंगात खरंच देवी आलेली की, नाटक होतं? खरं कारण आलं समोर

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा तालिब एन्काउंटरमध्ये ठार! UP पोलीसांची कारवाई, असा घडला चकमकीचा थरार

Gold Rate Today : नवीन वर्षात सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी महाग! सर्वसामान्यांना झटका, गुंतवणूकदार खुश; आजचे ताजे भाव पाहा

ताडोबातील खाण प्रकल्पाला अखेर मंजुरी; राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांचा विरोध डावलत सरकारचा निर्णय...

SCROLL FOR NEXT