Navratri will be celebrated in a simple manner in Rashin 
अहिल्यानगर

राशीनमध्ये नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने होणार

सकाळ वृत्तसेवा

राशीन : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान राशीनच्या जगदंबा देवीचा शारदीय नवरात्र उत्सव भाविकांशिवाय साध्या पध्दतीने पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा यात्राैत्सव रद्द करण्यात आल्याचा निर्णय कर्जत येथे झालेल्या प्रशासकीय बैठकित घेण्यात आला.

दरवर्षी प्रथेप्रमाणे साजरा होणारा जगदंबा देवीचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा 17 ऑक्टोबर रोजी पासुन सुरू होत आहे.मात्र कोरोना संसर्गाचा काळ असल्याने हा उत्सव बंद दरवाजाच्या आत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन प्रांत अधिकारी अर्चना नष्टे यांनी केले.

या बैठकीस प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड,जगदंबा देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष निळकंठ देशमुख,उपाध्यक्ष बाबासाहेब राजेभोसले,विश्वस्त सुनिल रेणूकर,अरूण रेणूकर,सुभाष रेणूकर,शरद शेटे,राशीनचे उपसरपंच शंकर देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी नष्टे म्हणाल्या की,शासकीय नियमानुसार संचार बंदी लागू असल्याने मंदिर परीसरात कोणालाही येण्यास परवानगी नाही.परीसरात चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे.नवरात्रातील देवीची पांरपारीक दैनदिंन पुजाअर्चा पुजारी यांचे हस्ते होईल.

काही मोजके सेवेधा-यांच्या उपस्थितीत हा उत्सव होईल.मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाही.या काळात पार पडणारे घटस्थापना,आरती,धुपारती आदी विधी हे सोशल माध्यमाच्या साह्याने भाविकांना दाखवण्यात येणार आहे.

यंदा कोरोनाची पार्श्वभुमीवर श्रद्धा व सरकारी नियम यांचा मेळ घालून उत्सव पार पाडण्यास भाविकांनी सहकार्य करावे, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असेही प्रांताधिकारी नष्टे म्हणाल्या.

यावेळी उपविभागीय पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले की,भाविकांनी कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात फिरकू नये.मंदिर परिसरांमध्ये 24 तास चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले . 
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

Sindkhed Raja Nagaradhyaksha Election : शरद पवारांचा २१ वर्षीय उमेदवार बनला नगराध्यक्ष, १५८ मतांनी विजयी; कोण आहे सौरभ तायडे?

Jalgaon Accident : जळगावात अपघातांचे सत्र! दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Navi Mumbai: नवी मुंबई ते नागपूर विमानसेवा सुरू होणार; कधीपासून अन् तिकीट दर काय असणार? जाणून घ्या...

Nashik News: रुग्णालयातूनच रणनिती आखली, आजारी असूनही राजकारणावर पकड केली; उमेदवाराला जिंकवून भुजबळांनी ताकद दाखवली!

SCROLL FOR NEXT