U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

Pakistan Lift U19 Asia Cup 2025 Trophy: १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेचे विजेतेपद पाकिस्तानच्या युवा संघाने जिंकले. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला.
Vaibhav Suryavanshi | U19 Asia Cup 2025 Final | India vs Pakistan

Vaibhav Suryavanshi | U19 Asia Cup 2025 Final | India vs Pakistan

Sakal

Updated on

१९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेचे विजेतेपद पाकिस्तानने जिंकले आहे. रविवारी दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला १९१ धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. यासह पाकिस्तानने दुसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरले आहे. यापूर्वी २०१२ मध्ये भारताविरुद्धच अंतिम सामना बरोबरीत संपल्याने संयुक्तरित्या त्यांनी पहिले विजेतेपद मिळवले होते. अंतिम सामन्यात समीर मिन्हास आणि पाकिस्तानचे गोलंदाज विजयाचे नायक ठरले.

या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानने ३४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव २६.२ षटकात १५६ धावांवर संपला. या सामन्यापूर्वी या स्पर्धेत भारतीय संघ अपराजित होता. मात्र पाकिस्तानने साखळी फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढत अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Suryavanshi | U19 Asia Cup 2025 Final | India vs Pakistan</p></div>
U19 Asia Cup, IND vs PAK: समीर मिन्हासचं द्विशतक हुकलं, भारतानं पाकिस्तानला साडेतीनशेच्या आत रोखलं; विजयासाठी 'इतक्या' धावांचं लक्ष्य
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com