Nehru Garden to be held in Ahmednagar on the lines of Hokayama, Japan 
अहिल्यानगर

जपानच्या होकायामा धर्तीवर नगरमध्ये होणार नेहरू गार्डन

सकाळ वृत्तसेवा

नगर ः शहराचे भाग्यविधाते (स्व.) नवनीतभाई बार्शीकर यांच्या काळात लालटाकी येथे उभारलेल्या पंडीत नेहरू उद्यानाला आता पुनर्वैभव प्राप्त होणार आहे. या परिसरात दीड एक जागेत अत्याधुनिक पद्धतीचे जपानी देशातील "होकायामा' धर्तीवर उद्यान उभारण्याचा धोरणात्मक निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून या विषयावर बैठक झाली. 

पंडीत नेहरू हे 1942 च्या "चले जाव' चळवळीत नगरच्या भुईकोट किल्ल्यात राहिले होते. त्याची आठवण म्हणून लालटाकी येथे नेहरू उद्यान उभारले होते. पुतळ्याच्या परिसरात काळाच्या ओघात अतिक्रमणे झाली. चौहूबाजुने जाहिरातीचे फलक लावण्यात आले. बागेची दुरवस्था झाली. पुतळ्याकडे ही दुर्लक्ष होत गेल्याने या परिसराला बकाल स्वरुप आले होते. 
कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील विविध विकास कामांच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी उद्योजक, शहरावर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्‍तींची पुढाकारातून बैठक आयोजित केली होती. 

मिसगर नागोरी ट्रस्टची लालटाकी येथे दीड एकर जागा आहे. नेहरू पुतळ्यासाठी काही जागा नगरपालिकेला दिली. उर्वरित जागेवर ट्रस्टची मालकी आहे. या ठिकाणी दीड एकर जागेवर उद्यानाचे आरक्षण आहे. आयुक्‍त शंकर गोरे यांनी ही संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याचे सांगितले. त्यामुळे या ठिकाणी उद्यान विकासित करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. 

महसूल मंत्री थोरात यांनी नवीन नगररचना कायद्यातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेला जागा मोफत दिल्यास संबंधित मालकास जागेच्या 30 टक्के जागा व्यावसायिक कारणासाठी वापरण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार मिसगर नागोरी ट्रस्टकडून जागा घेऊन जागेच्या 30 टक्के क्षेत्रावर व्यावसायिक गाळे उभारण्यास परवानगी द्या, असे सूचविले. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या विषयावर महापालिका, ट्रस्टचे विश्‍वस्त यांची लवकरत-लवकर बैठक घेऊन हा प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही दिली. 

पुणे महानगरपालिकेने सिंहगड रस्त्यावर जपानी उद्यानाच्या धर्तीवर "होकायामा' हे उद्यान उभारले आहे. जपानमधील शोभेच्या झाडांवर वापर करून हे उद्यान उभारले आहे. या ठिकाणी हे उद्यान उभारल्यास शहराच्या वैभवात भर पडेल, असे किरण काळे यांनी सूचविले. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आयुक्‍तांनी मान्य केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT