Nevasa police confiscate goods from Gujarat 
अहिल्यानगर

नेवाशाच्या पोलिसांचा गुजरातेवर छापा, आठ लाखांच्या कापसाची केली होती चोरी

सुनील गर्जे

नेवासे  : नऊ लाख रुपये किंमतीच्या कापसाची फरवणूक करणाऱ्या तिघांना नेवासे पोलिसांनी थेट गुजरातमध्ये जाऊन अटक केली. पोलिसांनी या गुन्ह्यातील ट्रकसह सुमारे साडेआठ लाख रुपयांचा कापूस जप्त केला. नेवासे पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

कापूस व्यापारी संदेश शरदलाल फिरोदिया (रा. प्रवरसंगम, ता. नेवासे)  यांनी (ता. 9) नोव्हेंबर  रोजी नेवासे पोलिसांत नऊ लाख तेरा  हजार 260 रुपये किंमतीचा कापूस ट्रक  ( GJ - 11 VV - 8805 ) मध्ये भरुन पटेल कॉटन इंडस्ट्रीज, हळवद रोड धागद्रा जि. सुरेंद्रनगर येथे नेवून खाली करणे अपेक्षित होते.

तसे न करता आरोपींनी परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याबद्दल नेवासे पोलिसांत तक्रार दिली होती.  दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास हा गुजरात राज्यात असलेने  उप विभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंडे, नेवासे पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली नेवाशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुर, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस नाईक राहुल यादव, महेश कचे, अशोक कुदळे, वसीम इनामदार यांच्या पथकाने जामनगर (गुजरात) येथे नगर गुन्हे शाखेच्या  तांत्रिक मदतीने तपास लावून जामनगर येथून कान्हा उर्फ देवल दिनेशभाई डाभी (वय 25, रा गोकुळधाम सोसायटी, दरेड ता. जि - जामनगर) बंदिया राम सोमात (वय 23, धंदा गाडी व्यापार रा. सेल नं 04 आर्शिवाद सोसायटी , रणजीत सागर रोड , ता.जि जामनगर) व  भरतभाई आंबाभाई मांगुकिया (वय 48, रा - न्यु कतारगाव , वरीयाव रोड , प्रमुख एव्हेन्यु सी-बिल्डींग रुम नं 202 जि. सुरत)  या तीन आरोपींना अटक करून  त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेली ट्रक तसेच बेंडवान ता. डेडीयापाडा जि. नर्मदा,  गुजरात येथुन गुन्ह्यातील 8 लाख 48 हजार रुपये किंमतीचा कापुस जप्त करण्यात आला आहे. 

दरम्यान आरोपींना नेवासे येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना (ता. 21) डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास प्रभारी पोलीस अधिकारी अभिनव त्यागी व पोलीस कॉन्स्टेबल अशोक कुदळे हे करीत आहेत.

आरोपींवर जळगाव जिल्ह्यातही गुन्हा!

नेवासे पोलिसांनी थेट गुजरात राज्यात कारवाईत अटक केलेल्या आरोपींवर धरणगाव पोलीस ठाणे,  जि.जळगाव येथे भादंवी कलम 407, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नेवासे पोलीसांमुळे आता जळगाव पोलिसांना आरोपी आयतेच मिळाले असून नेवासे येथील तापास संपल्यावर यासर्व आरोपींना जळगाव पोलिस ताब्यात घेणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT