Parner Road Sakal
अहिल्यानगर

रस्ते झाले सस्ते! नवं बांंधकाम केलेल्या रस्त्याचे हाताने निघतेय डांबर, नागरिक संतप्त | Video Viral

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : खेडोपाडी होणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आपण अनेकदा अनुभव घेतला असेल. तर खासगी कंत्राटदार पैसे उकळण्यासाठी कमी पैशांत बांधकाम करण्याचा पराक्रम करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एक व्हिडिओ समोर आला असून पारनेर तालुक्यातील एक नव्याने दुरूस्त करण्यात आलेला रस्ता हाताना उखडत असल्याचं समोर आलं आहे. काही स्थानिक नागरिक येथे फावड्याने रस्ता उकलताना दिसत आहेत. तर या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

दरम्यान, "असे रस्ते बनवणाऱ्या 'डांबरट' कंत्राटदारांच्या चेहऱ्यावर अस्सल 'डांबर' चोळलं पाहिजे!" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. फक्त डांबर टाकून चोपून घेण्यात आलं आहे असं नागरिक या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. सुरज बोरावके यांनी आपल्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून सदर कंत्राटदारांवर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT