नगर : लॉकडाउनमुळे अनेक उद्योजकांना तसेच हातावर पोट भरणाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला. परंतु नगरच्या बाजारपेठेला आता खऱ्या अर्थाने उभारी मिळणार आहे.
दुकानदारांसाठी खुशखबर आहे. कारण पूर्वी ही दुकाने पाच वाजेपर्यंतच उघडी ठेवली जात होती. त्यामुळे अनेकांचे नुकसान होत होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नवीन निर्णय घेतला आहे.
लॉकडाउनच्या आदेशाची 31 ऑगस्ट रोजी मुदत संपली असल्याने दिनांक 2 सप्टेंबरपासून नवे नियम लागू करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदीे यांनी मंगळवारी जारी केला. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, दुकाने आता सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यापूर्वी दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. त्याची मुदत दोन तासांनी वाढवली आहे.
याशिवाय सर्व नियमांचे नेहमीप्रमाणे पालन करण्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. याशिवाय लाऑकडाऊनचे सर्व नियम, जमावबंदीचा आदेश पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. वाहतुकीच्या नियमात कोणतेही बदल केलेले नाहीत. विवाह आणि अंत्यविधीचाही तोच नियम आहे.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.