This is news for chicken eaters, poultry owners 
अहिल्यानगर

ही बातमी आहे चिकन खवय्ये, पोल्ट्री मालकांसाठी

दौलत झावरे

नगर ः जिल्ह्यात मागील महिन्यात "बर्ड फ्लू'ने शिरकाव केल्यामुळे पोल्ट्री चालकांनी धसका घेतला होता. परंतु, पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करीत मार्गदर्शन सुरू केले. त्यामुळे जिल्ह्यात "बर्ड फ्लू'ची साथ आटोक्‍यात आणण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र, प्रशासन आजही सतर्क आहे. 

जिल्ह्यात मीडसांगवी (ता. पाथर्डी) येथे मृतावस्थेत कोंबड्या आढळून आल्यावर एकच खळबळ उडाली होती. मात्र, या मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यानंतर श्रीगोंदे शहर व भानगाव (ता. श्रीगोंदे) येथे मृत कावळे आढळून आले. त्यानंतर जिल्ह्यात एकामागून एक कोंबड्या व पक्ष्यांच्या मृत्यूच्या घटना समोर येत गेल्या.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करीत 78 अधिकारी, 312 कर्मचाऱ्यांची 78 पथके स्थापन केली. जिल्ह्यातील 25 ठिकाणच्या मृत पक्ष्यांचे नमूने तपासणीसाठी पुणे व भोपाळला पाठविण्यात आले. त्यातील सहा अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील चार पॉझिटिव्ह असून, दोन निगेटिव्ह आहेत. उर्वरित अहवाल प्रलंबित आहेत. 

पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नांमुळे "बर्ड फ्लू' आटोक्‍यात आला असला, तरी कुक्कटपालकांनी जैवसुरक्षा उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान, खबरदारीच्या उपाययोजना प्रशासन राबवित असून, कोंबड्यांसह इतर पक्षांचे नमुन्यांचे संकलन प्रक्रिया रोज सुरू आहे. त्यात जिल्ह्यातील विविध भागातील नमूने घेतले जात आहेत. 

जिल्ह्यात "बर्ड फ्लू' नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभाग सतर्क असल्यामुळे, साथ आटोक्‍यात आली. कुक्कटपालकांनीही जैव सुरक्षेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. 
- सुनील गडाख, सभापती, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती 

सद्यस्थितीत काही कुक्कटपालक पक्षांना खाद्य देत नाहीत. त्यामुळे पक्षांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे प्रकार करू नयेत. 
- डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद 

चिकनला मागणी वाढू लागली असून, भावातही वाढ होत आहे. सध्या चिकन 140 रुपये किलो या दराने विकले जात आहे. 
- तन्वीर शेख, विक्रेते, नगर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT