Prajakt Tanpure Sakal
अहिल्यानगर

Prajakt Tanpure : मोदींच्या हस्ते अर्धवट कामे झालेल्या निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम

निळवंडे धरण प्रकल्पाच्या कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. तशी माहिती स्थानिक नेत्यांनी पंतप्रधानांना दिलेली दिसत नाही

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : निळवंडे धरण प्रकल्पाच्या कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. तशी माहिती स्थानिक नेत्यांनी पंतप्रधानांना दिलेली दिसत नाही. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधानांच्या हस्ते अर्धवट कामे झालेल्या निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण करुन लाभार्थी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

राहुरी येथे आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याची राहुरी तालुक्यातील काही कामांना प्रत्यक्षात सुरुवातही झालेली नाही. डाव्या कालव्याची चाचणी घेण्यासाठी पाणी सोडताना दोन महिन्यांत उजव्या कालव्याला पाणी सोडले जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, वन खात्याच्या हद्दीतील कामांना परवानगी नसल्याने उजव्या कालव्याची कामे रखडली आहेत.

यापूर्वीच्या भाजप सरकारने पाच वर्षांत जेवढा निधी दिला, तेवढा महाविकास आघाडीने कोरोना संकट काळात प्रत्येक वर्षी निधी देऊन निळवंडेच्या कामांना गती दिली. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून भरीव निधी मिळाला. दुर्दैवाने गतिमंद सरकार आल्यावर गौण खनिजाच्या समस्येमुळे आठ महिने निळवंडेचे काम रखडले.

शेतकरी व मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून पंतप्रधानांच्या सभेला माणसं गोळा करण्याची केवीलवाणी वेळ आली. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावावी लागली. अधिकाऱ्यांना टार्गेट दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना कार्यक्रमाशी काडीमात्र संबंध नसतांना बळजबरीने जाण्यास भाग पाडले. तरी, कार्यक्रमाला जाणाऱ्या अनेक बस रिकाम्या धावल्या.

- प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT