Nine more corona positive in the district 
अहिल्यानगर

कोरोनाचा डंख सुरू... आज आला नऊचा लॉट...

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज नव्याने नऊ जण कोरोनाबाधित आढळले असून, कोरोनाबाधितांचा आकडा आता 226 वर पोचला आहे. पाच जण आज कोरोनामुक्तही झाले, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 

जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेमध्ये 32 व्यक्तींच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर शहरातील तिघांचा समावेश आहे. मदिनानगर येथील तेवीस वर्षीय महिला, पुणे नाका, नाईकवाडपुरा येथील व्यक्ती यांना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा झाली, तर मदिनानगर येथील 52 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून, ही व्यक्ती वाहनचालक म्हणून काम करते. बंगळूर येथून ती आली होती.

राहाता तालुक्‍यातील दोन जण कोरोनाबाधित झाले असून, त्यांत लिमगाव निघोज येथील 23 वर्षीय व्यक्ती, तसेच राहाता शहरातील बोठे गल्लीतील 36 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. नगर शहरातील पंचपीर चावडी (माळीवाडा) येथील 69 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे. ही व्यक्ती बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. दुपारी आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील मोमीनपुरा येथील तीस वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून, मुंबई येथून संगमनेर येथे आलेला 18 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर, नगर शहरातील पंचपीर चावडी माळीवाडा येथील 23 वर्षीय युवक कोरोनाने बाधित झाला आहे. 

एकूण रुग्णसंख्या : 226 
ऍक्‍टिव्ह रुग्ण : 74 
एकूण तपासणी : 3117 
निगेटिव्ह 2826 
अहवाल बाकी : 28 

पाच जणांची कोरोनावर मात 
जिल्ह्यातील आणखी पाच जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आणि ते घरी परतले. त्यांना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अकोले, शेवगाव आणि संगमनेर येथील प्रत्येकी एक, तर नगर महापालिका क्षेत्रातील दोन रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 141 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT