Minister Sunil Kedar
Minister Sunil Kedar  Sakal
अहमदनगर

'दुधाच्या गुणवत्तेत तडजोड नाही' - दुग्धविकासमंत्री सुनील केदार

आनंद गायकवाड


संगमनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी काढले. राजहंस दूध संघाच्या दूधभुकटी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते.

ते म्हणाले, की उपपदार्थांच्या निर्मितीमुळे दूधव्यवसायाला आर्थिक बळकटी मिळाली. या धंद्याला राज्य शासनाची खंबीर साथ आहे. जास्त दूध देणाऱ्या गुणवत्ताधारक कालवडींच्या निर्मितीसाठीच्या सॉर्टेड सिमेनमध्ये भेसळ होत आहे. काही खासगी कंपन्या बनावट सिमेन बाजारात आणीत आहेत. या गंभीर प्रकाराची राज्य सरकारने दखल घेतली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी प्रसंगी कठोर कायदा करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच दुधापासून बनणारे उच्च प्रतीचे चीझ म्हणून वनस्पती तेलापासून बनवलेले चीझ विकले जाते. भेसळ ओळखण्यासाठी पाश्चात्त्य देशाच्या धर्तीवर दोन चीझच्या रंगात बदल करण्यासाठी केंद्राकडे शिष्टमंडळ न्यावे लागेल. कोरोना संकटात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अतिरिक्त दुधाच्या भुकटीचा प्रकल्प सहकारी संघाना देण्याबाबत ठाम भूमिका घेतल्याचे सांगताना, दुधाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात राजहंस व महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी राज्यात उसाप्रमाणे दुधाला किमान हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. खासगी संस्थांना निर्बंध नसल्याने, सहकारी संस्थांनी नाकारलेले दूध खासगी संस्था कोणत्याही भावात स्वीकारतात. उत्पादकांना मिळणारा भाव व वाहतूक खर्चाचा याचा ताळमेळ नसल्याने, सहकारी संस्थांसाठी असलेला रेव्हेन्यू शेअरिंग फार्म्युला खासगीसह सर्वत्र राबवून समानता आणण्याची मागणी केली.
या वेळी आमदार संग्राम थोपटे, आमदार डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख, दुर्गा तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, साहेबराव गडाख, महानंदचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक श्यामसुंदर पाटील प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत शिपूरकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, सहायक निबंधक दीपक परागे, दुग्ध विकास अधिकारी योगेश नागरे, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, डॉ. संजय मालपाणी आदींसह सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

थोरातांमध्ये काँग्रेस मोठी करण्याची ताकद

नगर जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने 2019 च्या निवडणूका तोंडावर असताना भरभरून दिलेल्या काँग्रेस पक्षाला रातोरात सोडून सत्तेसाठी पक्षबदल केला. अशा बिकट परिस्थितीत राज्याचे नेतृत्व स्वीकारून बाळासाहेब थोरातांनी आपली ताकद सिद्ध केली. अशा लढवय्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. 2024 मध्ये काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष निर्माण करण्याची ताकद शांत व संयमी वृत्तीचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये आहे, असे मंत्री केदार म्हणाले.

केंद्र सरकारमुळे अडचणीत

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कोरोना काळात दुग्धविकास मंत्री व महानंद यांच्या पाठपुराव्यातून दररोज दहा लाख लिटर दुधाची भुकटी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. केंद्र सरकारने दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. तालुक्यात दूध संस्थांना जोडलेल्या पतसंस्थांमध्ये सुमारे एकवीसशे कोटींच्या ठेवी असल्याने हा पॅटर्न आदर्श ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT