No one withdrew their nominations on the fifth day of the district bank elections 
अहिल्यानगर

जिल्हा बँकेत पाचव्या दिवशी कोणीच अर्जच न काढल्याने प्रस्तापित हादरले

दौलत झावरे

नगर ः जिल्हा बॅंकेच्या 21 संचालकांच्या निवडीसाठी एकूण 195 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दाखल अर्जांची छाननी झाली आहे. 

अर्जमाघारीस सुरवात झाली आहे. अर्जमाघारीचा आजचा पाचवा दिवसही निरंक गेल्याने, निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी कायम राहते की काय, अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. आपल्या विरोधातील अर्ज माघारी घ्यावा, यासाठी प्रस्तापित विरोधी उमेदवारांच्या नाकदुऱ्या काढीत आहेत. पाचव्या दिवशी कोणीच अर्ज न काढल्याने नेते धास्तावले आहेत.

जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 21पैकी दोन जागा बिनविरोध झाल्या असून, 19 जागांसाठी 193 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अर्जमाघारीला 28 जानेवारीपासून सुरवात झाली असून, आज पाचव्या दिवसाअखेर एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचीच चर्चा आता सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील नेत्यांनी बॅंकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या गळाला दोन जण लागले असल्याचे बोलले जात असून, संबंधित दोघांचाही पक्षप्रवेश होऊन संबंधित मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज ! केदार शिंदेंच्या मावशीने सुनावले खडेबोल "काही अतिशहाणे.. "

SCROLL FOR NEXT