हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ sakal
अहमदनगर

अहमदनगर : लस न घेणाऱ्यांचे राशनपाणी बंद ;हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यातील नऊ लाख नागरिकांनी कोरोना लसीचा (Covid vaccine) एकही डोस घेतला नाही. लसीकरणाकडे पाठ फिरवणाऱ्यांचा, पेट्रोल, स्वस्त धान्यासह अन्य सुविधांचा लाभ बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना सद्यःस्थिती, तसेच ओमिक्रॉनच्या नवीन संसर्गाबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर नियोजन भवनाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत (press conference)ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, की कोरोनाचे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९० टक्के आहे. कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील सात हजार १४३ व्यक्तींचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली, तरीही ओमिक्रॉन संसर्गाचे संकट आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आपत्ती व्यवस्थापन निधीतून पन्नास हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मदत स्वरूपात देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी ऑफलाइन अर्जसुविधांसाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. १६२ व्यक्‍तींच्या वारसदारांना पन्नास हजार रुपयांची सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्यात आली.

जळीतकांडाचा अहवाल आला

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील जळीतकांडाची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करून अहवाल आरोग्य मंत्र्यांना सोपविला आहे. या अहवालात काय निष्कर्ष आहेत, हे आपल्याला माहिती नाही. दोषींवर कारवाई होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. नवीन वर्षात जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्‍थलांतर होईल.

शिक्षकांच्या बदल्यांसाठी सॉफ्टवेअर

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बदल्या होतील. शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ही ऑनलाइन राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT