The number of corona patients in Sangamner is up to one hundred 
अहिल्यानगर

सौ शेरी, एक संगमनेरी पण आता कोरोना ठरतोय भारी... बाधित सेंच्युरीच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा

नगर ः संगमनेर तालुक्‍यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. संगमनेरमधील कोरोनाबाधितांचा आकडा आज 80वर पोचला अाहे. तेथे कोरोना रूग्णांची शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यातच जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज संगमनेर तालुक्‍यातील आणखी सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 246वर पोचली आहे. दरम्यान, आज आणखी 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 186 झाली आहे. संगमनेरात सौ शेरी, एक संगमनेरी असे अभिमानाने मिरवले जाते. परंतु तेथे कोरोना भारी पडत आहे.

चौथ्या लॉकडाउनच्या काळात बंधने सैल करण्यात आल्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यासह शहरात वाढत्या संख्येमुळे जिल्हावासीयांची चिंता आणखी वाढली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार, आणखी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

सातही बाधित व्यक्ती संगमनेर तालुक्‍यातील आहेत. त्यांतील तीन जण निमोण येथील एकाच कुटुंबातील आहेत. यात 14 वर्षांची मुलगी, 18 वर्षांचा मुलगा व 36 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. उर्वरित चार जण संगमनेर शहरातील आहे. दाते मळा येथील 38 वर्षांची महिला, 65 वर्षांचा पुरुष, तर 32 वर्षांची महिला व मोगलपुरा येथील 48 वर्षांची महिला यांचा त्यांत समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 246 झाली असून, त्यांत महापालिका क्षेत्रातील 54, जिल्ह्यातील 131, अन्य राज्य तीन, अन्य देश आठ, तसेच अन्य जिल्ह्यांतील 50 व्यक्तींचा समावेश आहे. 


70 वर्षांच्या आजीसह 19 जण घरी 
जिल्ह्यातील 19 जणांनी आज कोरोनावर मात मिळवली. त्यांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यात नगर शहरातील आठ, शेवगाव चार, संगमनेर तीन, पारनेर दोन, राहाता व पाथर्डी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना निरोप दिला.

नगर शहरातील माळीवाडा येथील 70 वर्षांच्या आजीला कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते. मात्र, आजीने अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्या आज बऱ्या होऊन घरी परतल्या. हीच गोष्ट संगमनेरच्या कोल्हेवाडी रस्ता परिसरातील 13 महिन्यांच्या चिमुकलीबाबत घडली. कुटुंबातील सदस्याला झालेला कोरोना तिच्यापर्यंत पोचला. मात्र, तीही यावर मात करीत सुखरूप घरी परतली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT