The number of corona patients in the town is eight hundred 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोना बाधितांचा आजचा आकडा आठशेचा

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात आज 875 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 35 हजार 644 इतकी झाली आहे.

काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 790 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4341 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाने 665 जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 148, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 223 आणि अँटीजेन चाचणीत 419 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरात 70, संगमनेर तीन, पाथर्डी चार, नगर ग्रामीण नऊ, श्रीरामपूर दोन, नेवासे 12, अकोले 17, राहुरी एक, शेवगाव तीन, कोपरगाव सहा, कर्जत पाच, मिलिटरी हॉस्पिटल 15 तर इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 223 रुग्णांपैकी नगर शहरातील 77, संगमनेर 16, राहाता 15, पाथर्डी एक, नगर ग्रामीण 26, श्रीरामपूर 18, नेवासे 15, श्रीगोंदे तीन, पारनेर 18, अकोले दोन, राहुरी 19, शेवगाव दोन, कोपरगाव एक, जामखेड सहा तर कर्जतमधील चार रुग्णांचा समावेश आहे. 

अँटीजेन चाचणीत आज 419 जण बाधित आढळुन आलेल्यांमध्ये नगर शहरातील 17, संगमनेर 79, राहाता 27, पाथर्डी 48, नगर ग्रामीण सहा, श्रीरामपूर 21, भिंगार सहा, नेवासे सहा, श्रीगोंदे 22, पारनेर 19, अकोले 41, राहुरी 18, शेवगाव 12, कोपरगाव 28, जामखेड 30 तर कर्जतमधील 39 अशा रुग्णांचा समावेश आहे. 

  • * बरे झालेली रुग्ण संख्या : 35644 
  • * उपचार सुरू असलेले रूग्ण : 4341 
  • * मृत्यू : 665 
  • * एकूण रूग्ण संख्या : 40650 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा गोंधळ

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT