Officers and employees walk around with files ... 
अहिल्यानगर

अधिकारी अन् कर्मचारीच फिरतात फाईल घेऊन...

दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी रजेवर असल्यामुळे या विभागात कामकाजासाठी कर्मचारीच नाहीत. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना फायलींची ने-आण करावी लागत आहे. 

हेही वाचा ः आय लव्ह माय जॉब..! 

जिल्ह्यातील 1318 गावांचा कारभार जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाकडून पाहिला जात आहे. या विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कक्ष अधिकाऱ्यांसह कारकून व चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदे कार्यरत आहेत.

प्रत्येक जण आपापली कामे करीत आहे. या विभागात दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्यांतील एक कर्मचारी आजारी असल्यामुळे तो दीर्घ रजेवर गेला आहे. दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या घरची अडचण असल्यामुळे तोही रजेवर आहे. त्यामुळे या विभागाला एकही चतुर्थ श्रेणी कर्मचारी नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. 

ग्रामपंचायत विभागाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची तात्पुरती नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी सामान्य प्रशासनाकडे केली होती. त्यांच्याकडून एका विभागातून कर्मचाऱ्याची तात्पुरती नियुक्ती तत्काळ केली असली, तरी संबंधित कर्मचारी पूर्ण वेळ राहत नाही. ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर आता फायलींची ने-आण करण्याची वेळ आली आहे.

पूर्णवेळ कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, यासाठी ग्रामपंचायत विभागाकडून पाठपुरावा सुरू असला, तरी त्यांना तसा कर्मचारी मिळत नसल्याने आता सर्व कामे करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे. 


ग्रामपंचायत विभागात दोन चतुर्थ कर्मचारी नियुक्त असून, ते सध्या रजेवर आहेत. पूर्ण वेळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या नियुक्तीसाठी आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. 
- निखिलकुमार ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग , अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT