An old man from Jamgaon died of a heart attack, his wife also negative 
अहिल्यानगर

जामगावातील वृद्धाचा मृत्यू ह्रदयविकाराने, पत्नीही निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः जामगाव येथील 62 वर्षीय वृद्धाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा अहवाल जिल्हा रूग्णालयाने दिला आहे. तसेच त्यांच्या पत्नी यांचाही स्त्राव घेण्यात आला होता, तो अहवालसुद्धा निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे जामगाव आद्यापि कोरोनामुक्तच असल्याचे सिद्ध झाले आहे. 

या बाबत माहिती अशी की, जामगाव येथील एका वृद्धास छातीत त्रास होऊ लागल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे त्यांचा (ता. 26 ) मृत्यू झाला होता. त्या नंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या वेळी त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा निष्पन्न झाले आहे. तसा अहवाल जिल्हा रूगण्लयाने दिला आहे. तसेच त्यांच्या पत्नी यांनाही त्या वेळी तपासणीसाठी जिल्हा रूगण्लयात नेले होते. त्यांचाही स्त्राव घेण्यात आला होता. त्यांच्या पत्नीचा अहवालसुद्धा निगेटीव्ह आला आहे.

या बाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या दोघांनाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे त्यांचा जिल्हा रूग्णालयाने दिलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्या वृद्धाच्या पत्नीची प्रकृती सध्या ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टर व त्यांचे निकटवर्तीय नातेवाईक सतीश शिंदे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियात वावड्या उडवल्या जातात. त्याचा मानसिक त्रास संबंधित रूग्ण तसेच नातेवाईंकांना होतो.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT