The old onion has gone down by a thousand rupees 
अहिल्यानगर

जुन्या कांद्याची तब्बल एक हजार रूपयांनी घसरगुंडी

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी जुना कांदाही विक्रीस आणीत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. येथील बाजार समितीच्या कांदालिलावात शुक्रवारी (ता. 18) जुन्या कांद्याच्या दरात एक हजाराने घसरण झाली. स्थानिक बाजारासह नाशिक, पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातून नवीन कांद्याची आवक सुरू असल्याने, जुन्या कांद्याच्या दरात सलग घसरण सुरू आहे. बाजारात ग्राहकांनी नवीन कांद्याच्या खरेदीला पसंती दिली. 

तालुक्‍यातील ग्रामीण भागात साठविलेला जुना कांदा आता केवळ पाच टक्केच शिल्लक आहे. ठराविक कांदाउत्पादकांनी दरवाढीची अपेक्षा ठेवून, अनेक महिने तो साठवून ठेवला. मात्र, नवीन कांदा बाजारात दाखल झाल्याने दर घसरले. त्यामुळे जुन्या कांद्याची विक्री करणे गरजेचे आहे.

येथील कांद्याला शुक्रवारच्या (ता. 18) लिलावात एक हजार ते एक हजार 800 रुपये दर मिळाला. त्यामुळे सलग दोन दिवसांत एक हजार ते 1200 रुपयांनी जुन्या कांद्याच्या दरात घसरण झाली. परिणामी, कांदा दरवाढीच्या प्रतीक्षेतील उत्पादकांना फटका बसला. पुढील काळात नवीन कांद्याची आवक वाढल्यावर जुन्या कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्‍यता किशोर कालंगडे यांनी वर्तविली. 

नवीन कांद्याची आवक आणि दराचे चढ-उतार पाहून जुन्या कांद्याचा व्यापार होणार आहे. शुक्रवारच्या (ता. 18) येथील लिलावात जुन्या कांद्याला एक हजार ते एक हजार 800 रुपये दर मिळाला. नवीन कांद्याला एक हजार ते दोन हजार 100 रुपये दर मिळाला.

दरम्यान, शुक्रवारच्या लिलावात पाच हजार 396 कांदागोण्यांची आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून कांदालिलावात सहा ते सात हजार गोण्यांची आवक होते. नगर आणि नाशिक भागातील व्यापारी कांदा खरेदी करतात.

सध्या नगरसह घोडेगाव (ता. नेवासे) येथील कांदालिलावात नवीन कांद्याची आवक सुरू आहे. त्याचा परिणाम जुन्या कांद्याच्या दरावर झाल्याचे दिसते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

SCROLL FOR NEXT