omicron free sakal
अहिल्यानगर

नायजेरिया येथून आलेली ओमिक्राॅनबाधित महिला उपचारानंतर सुखरुप घरी परतली

ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले

गौरव साळुंके

श्रीरामपूर : नायजेरिया येथून श्रीरामपूरात आलेल्या ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेचा उपचारानंतर कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने महिलेसह तिच्या मुलाला नुकतेच सुखरुप घरी सोडण्यात आले आहे.ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. असून काल (रविवारी) त्यांची पुन्हा ओमिक्राॅनची तपासणी केली. त्यात सदर महिलेसह सहा वर्षीय मुलाचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. तसेच त्यांच्या कुटूंबातील इतर लोकांनी देखील कोरोना लसीकरण केलेले होते. त्यामुळे उपचार घेवून त्या लवकर बरया झाल्या. त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाइन ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.नोकरीनिमित्त नायजेरिया (वेस्ट आफ्रिका) येथे गेलेल्या महिलेसह त्यांचा सहा वर्षांचा मुलगा १५ डिसेंबर रोजी श्रीरामपूरात आले होते. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी आरोग्य विभागाने त्यांची कोरोना तपासणी केली. त्यात महिला आणि दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले.

त्यामुळे ओमिक्राॅन तपासणीसाठी त्यांच्या स्रावाचे नमुने तातडीने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील सुमारे ५५ नागरीकांचा शोध घेवून सर्वांची कोरोना तपासणी केली. सुदैवाने त्यातील सर्वांचे तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले.परंतू शुक्रवारी (ता.२४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिलेचा ओमिक्राॅनचा तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. अहमदनगर जिल्ह्यात अखेर ओमिक्राॅनचा शिरकाव झाल्याना जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

परिणामी, जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातले होते

शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, कंपनी, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालये, सभा, मेळावे अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक केले आहे. तसेच लस घेतलेली नसेल तर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळणार नसल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लागू केला होता.

लसीकरण करुन प्रशासनाला सहकार्य करावे

कोरोनासह ओमिक्राॅनचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणासह घराबाहेर पडतांना मास्क वापरणे गरजेचे आहे. नागरीकांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले, नसलेल्या नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे, आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. राजश्री देशमुख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT