vaccine for child  child vaccination
vaccine for child child vaccination 
अहमदनगर

सात केंद्रांवरून तरुणाईचे लसीकरण होणार; राधाकृष्णन बी. आयुक्त

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील इयत्ता दहावी ते बारावीतील १५ ते १८ वर्ष वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाला (youth vaccination)सोमवारपासून सुरवात होणार आहे. महापालिकेने १ लाख तरुणांच्या लसीकरणासाठी सात केंद्राची व्यवस्था केली आहे. मनपाकडे शाळांद्वारे येणाऱ्या विनंतीनुसार त्या-त्या शाळांमध्ये लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय शाळांनी महापालिकेकडे विनंती केल्यास तेथेही लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग येईल. (on monday started youth vaccination campeign in 15 to 18 age)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण करण्याची घोषणा केली. १५ ते १८ वर्ष वयोगटात इयत्ता दहावी ते बारावीपर्यंच्या तरुणांचा समावेश आहे. शहरात या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास एक लाखापर्यंत आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिरे घेण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबत मनपा शिक्षण विभागाला निर्देश दिले आहे. लसीकरणासाठी कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्याची सूचना त्यांनी केली. परंतु अद्याप कुठल्याही शाळेकडून लसीकरण केंद्रासाठी विनंती आली नाही. परंतु महापालिकेने या तरुणाईसाठी सात लसीकरण केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पालकांच्या संमतीनेच मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देऊन सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शैक्षणिक संस्थांना शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शिबिर आयोजित करायचे असल्यास त्यांनी मनपाला माहिती द्यावी.

- राधाकृष्णन बी., आयुक्त.

या सात केंद्रांवर मिळणार लस मेडिकल, एम्स, मनपाचे गांधीनगरातील इंदिरा गांधी रुग्णालय, दिघोरीतील प्रगती सभागृह आयसोलेशन हॉस्पिटल, मध्य रेल्वे रुग्णालय, कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय, या सात केंद्रांवर तरुणांना लस मिळणार आहे. हे आहेत पात्र तरुण ३१ डिसेंबर २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. लस घेतल्यानंतर मुलांची देखरेख करण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध राहतील आणि त्यांना अर्ध्या तासाने घरी सोडले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT