One of the accused in Nevasa was sentenced to ten years 
अहिल्यानगर

नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा

सुनील गर्जे

नेवासे : नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणा-या नाराधमास नेवासे जिल्हा न्यायालयाने दहा वर्षांची सक्तमजूरी व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ही घटना एप्रिल 2018 मध्ये नेवासे तालुक्यात घडली होती. 

या बाबत माहिती अशी, सदर प्रकरणातील आरोपी याने आजोबाच्या घरी असणा-या अल्पवयीन मुलीस सोयरिकिच्या अनुषंगाने पाहुणे पाहायला आले आहेत असा खोटा बनाव केला. पीडितेस आजोबाच्या घरून स्वतःचे मोटारसाईकलवर बसवून घेवून गेला. रस्त्यात लघविचा बहाणा करून निर्जनस्थळी मोटारसाईकल थांबविली.  जवळच्या उसाच्या शेतात बळजबरीने लैगिंक अत्याचार केला. त्यानतंर आरोपीने पिडीतेस गावच्या एस.टी.स्टॅण्डजवळ सोडून दिले.

पीडितेस धमकी देवून तेथून पोबारा केला. त्यानंतर पिडीतेने घरी जाऊन सदरची घटना आजी-आजोबांना सांगितली. त्यावर आजोबांनी घटनेबाबत पीडीतेचा भाऊ व विधवा आईस सांगितले. या बाबत पिडीतेच्या भावाने नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी विरूध्द बलात्कारसह आदी गुन्हयाची नोंद करण्यात आली. 

सदर खटल्यात चौकशीकामी एकूण नऊ साक्षीदार सरकारपक्षातर्फे तपासण्यात आले. सदरचे साक्षीपुरावे व सरकारपक्षातर्फे केलेला युक्तीवाद ग्राहय धरून नेवासे येथील जिल्हा व विशेष न्यायाधीश एस. एम. तापकिरे यांनी शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मयुरेश नवले यांनी काम पाहीले. त्यांना अतिरिक्त सरकारी वकील एम.पी. गवते यांनी सहकार्य केले. अहमदनगर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT