Both were arrested 
अहिल्यानगर

भावाच्या मदतीने पत्नीनेच काढला नवऱ्याचा काटा

गोरक्षनाथ बांदल

नगर : वाळुंज-पारगाव येथील एकाचा काल पहाटे मृत्यू झाला. संतोष दत्तात्रेय मोरे (वय 42) असे मृताचे नाव आहे. 
या बाबत संदीप सोपान मोरे (वय 39) यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

मृत संतोष यांची पत्नी प्रियांका ऊर्फ शारदा संतोष मोरे व तिचा भाऊ रामेश्‍वर विठ्ठल दशवंत (रा. ताहाराबाद, ता. राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली. 
वाळुंज-पारगाव येथील संतोष मोरे (रा. वाळुंज) यांच्याशी प्रियांकाचा विवाह झाला होता. त्यांना तीन मुले झाली. मात्र, नंतर घरगुती कारणांवरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. ते विकोपाला गेले होते. दोघांमध्ये शनिवारी (ता. 20) किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला.

हे भांडण सोडविण्यासाठी प्रियांकाने भाऊ रामेश्‍वरला बोलाविले होते. मात्र, नंतर वाद वाढत गेल्याने संतापलेल्या रामेश्‍वर याने कुऱ्हाडीचा मेहुणा संतोष यांच्या डोक्‍यात घाव घातला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत फिर्यादी संदीप मोरे यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

पतीच्या मृत्यूबद्दल प्रियांकाला विचारणा केली असता, सुरवातीला तिने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी तिला विश्‍वासात घेऊन विचारल्यावर भावाने पतीच्या डोक्‍यात कुऱ्हाडीचा वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नगर तालुका पोलिसांनी ताहाराबाद येथे जाऊन आरोपी रामेश्‍वरला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल तपास करीत आहेत. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT