Corona patient again in Nevasa
Corona patient again in Nevasa 
अहमदनगर

बांधाच्या भांडणात गेला एकाचा जीव

सकाळ वृत्तसेवा

जामखेड ः  साकत येथे शेतीच्या वादातून ओमकार अशोक वराट (वय-19) याचा खून झाला. मारहाणीत त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. सातजणांविरुद्ध पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या पैकी चौघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. अजय वराट याने दिलेल्या विरोधी फिर्यादीवरून मयत ओमकार याच्यासह चौघांविरुध्द जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तिघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

या संदर्भात ओमकारचा भाऊ अमोल अशोक वराट  (वय 22)   (व्यवसाय: रेडिओलॉजी टेक्निशियन)  यांने दिलेल्या फिर्यादीवरून  जामखेड पोलिसात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. यापैकी  चौघांना पोलिसांनी  अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींची नावे अनुक्रमे अशी;  किरण नागनाथ वराट ( वय 48), उद्धव नागनाथ वराट (वय 59 ); विनोद उद्धव वराट (वय 26); बाळू उर्फ गणेश उद्धव वराट (वय 30) या चौघांना पोलिसांनी गजाआड केले. उर्वरित तिघे
अजय किरण वराट ; विजय किरण वराट ; सुदाम किरण वराट हे  फरार आहेत. 

या संदर्भात पोलिसात अमोल वराट यांनी  दाखल केलेल्या फिर्यादेतील आशय असा; साकत (ता.जामखेड) येथे शेतातील वस्तीवर (ता: 16 मे) रोजी झालेल्या शेतीच्या भांडणावरून ओमकार वराटच्या डोक्याला मार लागल्याने नगर येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार ओमकार यास नगर येथे उपचारासाठी दाखल केले. 

16 मे रोजी सकाळी दहा वाजता साकत शिवारातील शेतीचे मोजणीबाबत फिर्यादीचे वडील अशोक वराट यांनी आपण सर्वांची शेती मोजून घेऊ म्हणजे वाद मिटेल असे बोलले होते. त्याचा आरोपी किरण नागनाथ वराट यास राग आल्याने तुम्ही आमची शेताची मोजणी करायची असे का म्हणता? असे म्हणून किरण नागनाथ वराट व त्याची तीन मुले अजय किरण वराट, विजय किरण वराट , सुदाम किरण वराट व त्याचा भाऊ उद्धव नागनाथ वराट व त्याचे भावाची दोन मुले विनोद वराट व बाळू वराट
 या सर्वांनी आम्हाला शिवीगाळ दमदाटी करून आज तुमचा काटा काढतो असे म्हणून मारहाण केली.

आम्ही तेथून मोटारसायकल व शेतातील वस्तीवर पळून आलो. वरील सर्वांनी मधल्या मार्गाने येत पुन्हा आम्हाला मारहाण केली. वस्तीवर बाहेर खाटेवर झोपलेला भाऊ ओमकार झोपेत असतानाच अजय किरण वराट व विजय किरण वराट यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने त्याला जोरात जबर मारहाण केली. 

अजय किरण वराटच्या फिर्यादीतील आशय असा, आम्हाला शेतीच्या कारणावरून मारहाण केल्याचे त्याचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर लँड जिहाद," भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rahul Gandhi : 'ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स...'; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केला प्रश्न

MS Dhoni: धोनीचं श्वानप्रेम! फादर्स डे निमित्त लेकीनं शेअर केला तो खास Video; एकदा पाहाच

T Raja Singh: "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," 400 पारच्या नाऱ्यावर काय म्हणाला भाजपचा कट्टर आमदार

Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

SCROLL FOR NEXT