One person was injured in a police vehicle
One person was injured in a police vehicle 
अहमदनगर

व्वा रे पोलिस...दुचाकीने ठोकरले अन त्याला मृत्यूच्या दारात ढकलले

सकाळ वृत्तसेवा

नगर : सावेडी परिसरातील जुन्या बोल्हेगाव रस्त्यावर गुरुवारी (ता. 2) सायंकाळी साडेसात वाजता पोलिसांच्या दुचाकीची सायकलस्वाराला धडक बसली. त्यात सायकलस्वार गंभीर जखमी झाला. मात्र, याबाबत अद्याप पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

दुचाकीवरील "त्या' पोलिसांनीही हात वर केले. जखमी सायकलस्वार मात्र सध्या मृत्यूच्या दारात उभा आहे. 
सावेडी परिसरातील ठकचंद कुंडलिक उकांडे (वय 47) एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात. कंपनीतून गुरुवारी (ता. 2) सायंकाळी ते सायकलवरून घरी जात होते.

नगर-मनमाड रस्त्यावर सावेडीतील परिचय हॉटेलजवळून जाताना, जुन्या बोल्हेगाव रस्त्यावरून दोन पोलिस दुचाकीवरून जात होते. त्या वेळी पोलिसांच्या दुचाकीची उकांडे यांच्या सायकलला जोरात धडक बसली. त्यात उकांडे रस्त्यावर पडले. डोक्‍याला, छातीला जबर मार लागल्याने ते जागीच बेशुद्ध झाले. 

दुचाकीवरील एका पोलिसाने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तो पोलिस निघून गेला. गेल्या पाच दिवसांपासून उकांडे बेशुद्धावस्थेत आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून तोफखाना पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद पाठविली. मात्र, कोणीच फिर्यादी नसल्याने, तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेतली नाही.
तोफखाना पोलिस फिर्यादीची वाट पाहत आहेत.

दुसरीकडे, जखमी ठकचंद उकांडे यांचा मुलगा विशाल वडिलांच्या उपचारासाठी धडपडत आहे. 
दरम्यान, उकांडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर या घटनेस जबाबदार पोलिस पुन्हा तिकडे फिरकलेही नाहीत. एकदा दवाखान्यात नेऊन सोडल्यावर आपले काम संपले, अशी मानसिकताच त्यातून दिसते. गेल्या पाच दिवसांपासून उकांडे बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पोलिसांच्या भूमिकेबद्दल अपघात प्रत्यक्ष पाहिलेल्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. या घटनेबाबत तोफखाना पोलिस निरीक्षक हारूण मुलांनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "माहिती घेऊन सांगतो,' असे सांगितले. 

जखमी कोविड वॉर्डात 
अपघात झाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर खासगी रुग्णालयात जाऊनही जखमीची चौकशी केली. मात्र, अद्याप फिर्याद नोंदविली नाही, कारण सध्या जखमी उकांडे यांना जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये ठेवले आहे. त्यामुळे तेथे जाऊन त्यांचा अथवा नातेवाइकांचा जबाब घ्यायचा कसा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

अपघातानंतर पोलिस कर्मचाऱ्याने वडिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ते पोलिस रुग्णालयाकडे फिरकले नाहीत. तोफखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी एकदा येऊन गेले. तेही पुन्हा आले नाहीत. संशयित आरोपी असलेल्या पोलिसांना वाचविण्याचे पोलिस खात्याचे प्रयत्न यातून दिसून येतात. 
- विशाल उकांडे, जखमीचा मुलगा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT