In Parner, 88 gram panchayats are under the control of past administrators 
अहिल्यानगर

पारनेरमध्ये ८८ ग्रामपंचायती गेल्या प्रशासकांच्या ताब्यात

मार्तंड बुचुडे

पारनेर ः तालुक्‍यातील मुदत संपणाऱ्या तब्बल 88 ग्रामपंचायतीवर अखेर प्रशासकांच्या नियुक्‍त्या झाल्या. प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्ताराधिकारी, त्या दर्जाच्या शाखा अभियंत्यांच्या नियुक्‍त्या जाहीर झाल्याने अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

राजकीय पाठिंब्याच्या जोरावर का होईना मागच्या दाराने आपण गावात सरपंच होऊ, अशी अनेकांची मनोकामना अपुरी राहिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह राज्यातील सरपंच परिषद, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीच सरकारी आदेशाप्रमाणे प्रशासक नियुक्तीस विरोध केला होता.

काही सामाजिक संघटना, सरपंच परिषदेने तर थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. यामुळे राजकीय पदाधिकारी- कार्यकर्त्यांऐवजी शासनाने अधिकाऱ्यांच्या प्रशासकपदी नियुक्‍त्या केल्या आहेत. 

प्रशासकपदी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी, शाखा अभियंता, कृषी अधिकारी व कृषी विस्ताराधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या झाल्या आहेत. तालुक्‍यातील आठ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्टअखेर संपली, तर उर्वरित 80 ग्रामपंचायतींची मुदती सप्टेंबरअखेर संपत आहेत.

ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल तेथे संबंधितांनी ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून कारभार स्वीकारावा, असे आदेशात म्हटले आहे. या प्रशासकांना मूळचा पदभार सांभाळून प्रशासकपदाचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Netanyahu Conflict : डोनाल्ड ट्रम्प संतापले ! इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना वाहिली शिव्यांची लाखोली; नेमकं काय घडलं?

बाबो! रणवीर सिंहची संपत्ती ऐकून व्हाल थक्क; आलिशान घरं, लक्झरी गाड्यांचा ताफा आणि बरंच काही

MSME loan Scheme: लघु व मध्यम उद्योगांसाठी तातडीची कर्ज हमी योजना; एकूण दोन लाख ५५ हजार कोटींचा निधी

JEE Advanced 2026 : मोठी बातमी! जेईई ॲडव्हान्स्डमध्ये शुभम कुमार देशात पहिला; पुण्याची आरोही मुलींमध्ये अव्वल

Monsoon 2026: मान्सून 26 मे रोजी केरळात येणार होता, मग अचानक कुठे गायब झाला? IMD ने सांगितले खरे कारण

SCROLL FOR NEXT