Parner Taluka Dudh Sangh will resume from Saturday after a period of 10 years
Parner Taluka Dudh Sangh will resume from Saturday after a period of 10 years  
अहमदनगर

पारनेर तालुका दूध संघ 10 वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा होतोय सुरू

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्‍याची सहकार क्षेत्रातील कामधेनू असलेल्या पारनेर तालुका दूध संघात एके काळी 80 हजार लिटर दुधाचे संकलन होत होते. तेथे 95 कर्मचारी काम करीत होते. अशा वैभवशाली दूध संघाच्या संचालकांचे दुर्लक्ष व खासगी दूधसंकलन करणाऱ्या संस्थांशी असलेली स्पर्धा, यात या संघाचा टिकाव लागला नाही. त्यामुळे संघ बंद पडला. 95 कर्मचारी घरी गेले. मात्र, दादासाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या प्रशासकीय समितीने या संघाचे पुनरुज्जीवन केले. आता तालुका दूध संघ शनिवारी (ता. 27) पासून 10 वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा सुरू होत आहे. 

पारनेर तालुका दूध संघ दहा वर्षांपासून बंद आहे. नूतन प्रशासकीय अध्यक्ष पठारे, सदस्य संभाजी रोहकले व सुरेश थोरात यांनी नव्या जोमाने या संघाचे पुनरुज्जीवन केले. संघाने आता कात टाकली. शनिवारी दूध चिलिंगचे उद्‌घाटन व व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन आमदार नीलेश लंके व "महानंद'चे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी दूधउत्पादक शेतकऱ्यांचा मेळावाही आयोजित केला आहे. 

तालुका दूध संघाची 2003 मध्ये नोंदणी झाली. त्या वेळी जिल्हा दूध संघ व तालुका दूध संघ एकत्रित होते. सन 2005 मध्ये तालुका दूध संघ वेगळा झाला व त्यांना त्यांची मालमत्ताही देण्यात आली. त्या वेळी संघात 80 हजार लिटर दूधसंकलन होते व 95 कर्मचारी काम करीत होते. मात्र, पुढे तालुक्‍यात दूधसंकलनात झालेला खासगीकरणाचा प्रवेश व वाढती स्पर्धा, यामुळे दूध संघाचे संकलन 18 हजार लिटरवर आले व 2010 मध्ये तर दूध संघ बंदच करण्यात आला. त्यामुळे संघाचे 95 कर्मचारीही घरी गेले. आता प्रशासकीय समितीने संघाचे पुनरुज्जीवन करून नव्या जोमाने दूधसंकलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अवघ्या चार कर्मचाऱ्यांवर संकलन सुरू करण्यात येणार आहे. तसेच, येथे व्यापारी गाळे उभारून संघाला उत्पन्नवाढीसाठीही प्रयत्न केला जाणार आहे. संघ दूधउत्पादकांना स्वतःच्या नफ्यातील एक रुपया व संघाने ज्या संस्थेला दूध घालावयाचा करार केला आहे, ती संस्था 50 पैसे, असा दीड रुपया प्रतिलिटर दर खासगी दूधसंकलन करणाऱ्यांपेक्षा जास्त देणार आहे. आम्ही संघाच्या 95 कर्मचाऱ्यांना त्यांच्या उर्वरित सेवाकाळातील नुकसान भरपाई व पगरापोटी तीन कोटी 15 लाखांचे वाटप केल्याचे संघाचे अध्यक्ष पठारे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

75 बल्क कूलर बसणार 

मार्चअखेर पाच व जिल्हा नियोजन मंडळातर्फे 15 बल्क कूलर बसविण्यात येणार आहेत. तसेच, राष्ट्रीय डेअरी विकास निगमकडून 50 बल्क कूलर घेऊन, ज्या ठिकाणी दूधसंकलन केले जाते, त्या प्रत्येक दूध संस्थेला एक बल्क कुलर, असे 75 बल्क कूलर आगामी काळात बसविण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT