The past glory of the old building will be gained 
अहिल्यानगर

ऐतिहासिक वास्तूचे भाग्य उजाळणार 

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सामाईक अंतर राखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरवात झाली आहे. त्यासाठी जुन्या इमारतीतील अडगळीच्या साहित्यासह स्टोअर रूम हलवून तेथे काही विभाग नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी आज (ता. आठ) मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. साहित्य हटवून काही विभागांना येथे हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागासह इतर विभागांमध्ये येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत कर्मचाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. या संदर्भात "सकाळ'ने कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्यानंतर प्रशासनाने नवीन इमारतीतील काही विभाग जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, जुन्या इमारतीत असलेल्या अडगळीच्या साहित्याचे निर्लेखन करण्यासंदर्भात स्थायी समितीत मंजुरीही घेण्यात आली आहे. त्या दृष्टीने निर्लेखनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, आज मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, बांधकामचे कार्यकारी अधिकारी डी. एम. गावडे आदींनी जुन्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. 

ऐतिहासिक वास्तूत "बांधकाम'च हलणार 
जिल्हा परिषदेच्या जुन्या व ऐतिहासिक वास्तूत नव्या इमारतीतून बांधकाम विभागच हलविण्यात येणार आहे. याच विभागात गर्दी होत असल्यामुळेच इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हाच विभाग हलविण्यात येणार आहे. 

जुन्या इमारतीतील साहित्य तातडीने हलविण्यात येणार असून, तेथे काही विभाग हलविण्यात येणार आहेत. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन , जिल्हा परिषद, अहमदनगर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक, सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाने आंदोलन

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT