Penalty for "spraying" of public places 
अहिल्यानगर

सार्वजनिक ठिकाणच्या "पिचकारी'ला दंड 

दौलत झावरे

नगर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेच्या सभेत मंजुरी मिळाल्यानंतर, प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. त्याला त्यांनी हिरवा कंदील दाखविल्याने, आता प्रत्यक्ष कारवाईला सुरवात होत आहे. या ठरावाची आता राजपत्रात नोंद होणार असून, जिल्ह्यात कारवाईला लवकरच सुरवात होणार आहे. 

सार्वजनिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी जिल्हा परिषदेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या पुढाकारातून केला. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यामध्ये उपविधीद्वारे दुरुस्ती करून तो जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या लेखी प्रतिपादन सभेत हा ठराव मंजूर झाला. त्यानंतर कार्योत्तर मंजुरीसाठी तो विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. त्याला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर 50 रुपये दंडात्मक कारवाई होईल. ही सर्व प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. 

मास्क नसल्यावरही होणार दंड 
या अधिनियम दुरुस्तीत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवरही कार्यवाहीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ही दंडात्मक कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. 

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना 50 रुपये दंडाच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेनंतर आता विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली असून, त्याची राजपत्रात नोंद होणार आहे. या दंडात्मक कारवाईला लवकरच जिल्ह्यात सुरवात होणार आहे. 
- निखिलकुमार ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Ganeshotsav Return Travel : बाप्पाला निरोप देऊन परतणाऱ्या चाकरमान्यांची परतीची वाट बिकट; चिपळूणमध्ये सीएनजीसाठी 10 तास प्रतीक्षा, पंपांवर वाहनांच्या लांब रांगा

Marathi News Live Updates : शिरोलीत मिरवणुकीत होमगार्डला धक्काबुक्की; पोलिस अधिकारी सुनील गायकवाड, शशिकांत खवरे यांच्यात वादावादी

Nila Vikhe Patil : माजी केंद्रीय मंत्र्यांची नात स्वीडनच्या संसदेत खासदार; कोण आहेत नीला विखे पाटील?

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT