People did not even get water due to the virus 
अहिल्यानगर

कोरोनाने मजूर पाण्यालाही मोताद 

सकाळ वृत्तसेवा


कोल्हार,  : डोक्‍यावर आग ओकणारा सूर्य, मैलोन मैल पायपीट केल्यामुळे पोटात भुकेचा उडालेला 
भडका, डोक्‍यावर सामानाचे ओझे आणि खांद्यावर लेकरे, अशा स्थितीत मजल-दरमजल करीत शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत आपल्या गावी निघालेल्या मजुरांना पिण्याचे पाणी मिळाले आणि घशाला कोरड पडलेल्या लहानग्याने पाण्याचा पाइपच तोंडाला लावला. 


ओतूर (जि. पुणे) येथून मध्य प्रदेशात निघालेल्या शेतमजुरांवर लॉकडाउनमुळे बेतलेला हा विदारक प्रसंग. देशव्यापी लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये अडकून पडलेले हजारो कामगार, विद्यार्थी, पर्यटक आणि भाविकांच्या परतीचा मार्ग अखेर खुला झाला. या सर्वांची विशेष बसगाड्यांद्वारे त्यांच्या राज्यात रवानगी करण्यास केंद्राने राज्य सरकारांना परवानगी दिली.

गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील 
लाखो स्थलांतरितांना मोठा दिलासा मिळाला. परंतु आजही त्याबाबत सरकारच्या या निर्णयाबाबत प्रशासकीय व्यवस्था व पोलिस यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे दिसते. ओतूरला शेतीच्या कामासाठी मध्य प्रदेशातील मजूर दरवर्षीप्रमाणे यंदाही आले होते.

ही शेतकऱ्यांकडे कांदा काढण्यासाठी त्यांना स्थानिकांनी परवानगी दिली. परंतु प्रशासनाने ती नाकारली, म्हणून महिला व लहान मुलांसह मजूर मध्य प्रदेशात जाण्यासाठी पायी निघाले होते. रस्त्यात एका ट्रकचालकाने त्यांना गाडीत घेतले. तो ट्रक संगमनेरहून नगरला जात होता. चालकाने त्यांना कोल्हारला लोणी रस्त्याच्या चौकात सोडले. त्यांच्याकडून जास्त भाडेही घेतले. मजुरांना मध्य प्रदेशात जायचे असल्यामुळे त्यांनी शिर्डीकडे जाण्याचा रस्ता धरला.

वास्तविक पाहता त्यांना संगमनेरहून झगडे फाटामार्गे शिर्डी व त्यापुढील रस्ता जवळचा पडला असता. वाटेत ते तहानेने व्याकूळ झाले होते. त्यांना तिसगाववाडी फाट्यावरील मनोज गिरमे या शेतकऱ्याने पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली व जेवणाबाबतही विचारपूस केली. मजुरांनी बाभळेश्वरजवळ रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली स्वयंपाकासाठी दगडाची चूल मांडून जेवण करून पुढील प्रवासाला ते रवाना झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडणार, १३५ डॉलरवर पोहोचण्याची भीती; महागाई वाढणार?

Crime: दोन पत्नींपासून १८ मुलांचा बाप; तरीही तिसरीच्या नादी लागला; पण 'त्या' गोष्टीवरून बिनसलं; प्रेयसीनं व्यक्तीला भयंकरपणे संपवलं

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

Horoscope : उद्या बनतोय मंगलधन योग; 'या' 4 राशीच्या लोकांना अचानक मिळतील पैसे, भावकीतला त्रास होणार दूर, एक मोठं काम होणार पूर्ण

Dhule Municipal Corporation : धुळे महापालिकेत लोकशाही आली, पण सत्ता अद्याप लांबच! दोन महिने उलटले तरी समित्यांचा पत्ता नाही

SCROLL FOR NEXT