Ahmednagar District Central Co-operative Bank sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : जिल्हा बॅंक नोकरभरतीविरोधात याचिका

नोकर भरतीला टिळक भोस व शशिकांत चंगेडे यांनी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या(Ahmednagar District Central Co-operative Bank) नोकर भरतीला(Recruitment) टिळक भोस व शशिकांत चंगेडे यांनी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court)औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ता.१६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु असून याचिकाकर्त्यांच्या वतीने विधिज्ञ अनिरुद्ध निंबाळकर बाजू मांडत आहेत.

जून २०१७ मध्ये जिल्हा बॅंकेने लिपिक, कनिष्ठ अधिकारी आदी ४६५ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरतीत अनियमितता झाल्याने सहकार विभागाने भरतीची चौकशी केली व चौकशीअंती २०१८ साली ही भरती रद्द केली. त्यानंतर भरतीत निवडले गेलेल्या काही उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. याबाबत सुनावणी झाल्यानंतर सहकार विभागाचा आदेश रद्द करण्यात आला. न्यायालयाने चौकशीत ज्या उत्तरपत्रिकांबाबत आक्षेप आढळला, अशा ६४ उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार विभागीय सहनिबंधकांनी ही चौकशी केली. मात्र, या चौकशीय या उत्तरपत्रिकांना क्‍लिन चिट देण्यात आली.

ज्या सहकार विभागाला चौकशीत अगोदर अनियमितता आढळली होती. त्याच विभागाने पुढे ही भरती वैध असल्याचे जाहीर केले. सहकार विभागाने भरतीबाबत आपली योग्य बाजू न्यायालयात मांडली नाही. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे आवश्‍यक होते. ते दिले नाही. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर उत्तरपत्रिकांची फॉरेन्सिक तपासणी ही सरकारी एजन्सीमार्फत न करता जाणीपूर्वक खासगी एजन्सीमार्फत केली, असा आक्षेप भोस यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे घेतले होते. मात्र, आयुक्‍त कवडे यांनी आजवर काहीच कारवाई केली नाही. भरतीच्या उमेदवारांना साध्या टपालाने कॉल पाठविले. काही अपात्र उमेदवारांना नियुक्‍त्या दिल्या. या तक्रारीही चंगेडे यांनी केल्या होत्या. मात्र, सहकार विभाग काहीच दखल न घेता बॅंकेला व या घोटाळ्याला पाठिशी घालत असल्याचा दावा याचिकेत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT