The plaque on Sai Sansthan's dress code was torn down by the Bhumata Brigade 
अहिल्यानगर

साई संस्थानच्या ड्रेसकोडबाबतच्या त्या फलकाला भूमाता ब्रिगेडने फासले काळे

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः साईदर्शनासाठी भाविकांनी सभ्य पोषाखात यावे, असा मजकूर असलेल्या साईसंस्थानच्या विनंती फलकावर आज भूमाता ब्रिगेडच्या समर्थकांनी काळा रंग फेकून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

तेथे तैनात असलेले सुरक्षारक्षक व पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर लगेच फलक पुसून स्वच्छ करण्यात आला. अवघ्या पाच-सात मिनिटांत हे नाट्य संपुष्टात आले. 

साईसंस्थानने लावलेल्या फलकांवरील मजकूर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, अशी भूमिका घेत गेल्या 10 डिसेंबर रोजी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई येथील फलक हटविण्यासाठी शिर्डीला येत होत्या. मात्र, त्यांना नगर जिल्ह्याच्या सीमेवरच अडवून पोलिसांनी परत पुण्याला धाडले होते.

त्यावेळी त्यांनी येत्या 31 डिसेंबरपर्यंत फलक हटविले नाहीत, तर पुन्हा शिर्डीत येऊन फलक हटवू, असा इशारा दिला. ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांना विरोध करण्याची भूमिका घेतली होती. 

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास साईमंदिर परिसराच्या एक क्रमांकाच्या दरवाजाजवळ ही घटना घडली. या तिघांनी खाकी पाकीटातून काळे ऑईलसदृश्‍य पदार्थ एका फलकावर फेकला.

पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या माहितीनुसार, या तिघांनीही आपण भूमाता ब्रिगेडचे समर्थक असल्याचे सांगितले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे म्हणाले, की श्रद्धा व सबुरी ही साईबाबांची शिकवण आहे. फलकांवर काळा द्रव पदार्थ टाकण्याचा प्रयत्न झाला. संस्थान सुरक्षारक्षकांनी हे फलक लगेच स्वच्छ केले. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT