pm modi Esakal
अहिल्यानगर

PM मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, ५ वर्षांनी साईचरणी होणार नतमस्तक, अर्ध्या तासासाठी मंदिर राहणार बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची सुरू असलेली जोरदार तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिर्डी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे.

नरेंद्र मोदी दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या समाधीच दर्शन घेऊन करणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. तब्बल ५ वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साई बाबाचे दर्शन घेणार आहेत. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत.

दरम्यान आज देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांच शुभारंभ होणार असून अहमदनगरच्या आयुष रुग्णालयाचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-प्रणालीद्वारे लोकार्पण करतील.

कसा असेल पंतप्रधान मोदींचा अहमदनगर दौरा?

पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीत दाखल होणार

त्यानंतर पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेत, पूजा करतील

पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन करणार

यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल

पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील

सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश

या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना होतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

Pune News : थकबाकी न भरल्यास पथारी व्यावसायिक काळ्या यादीत; प्रशासनाचा इशारा

SCROLL FOR NEXT