Police alert after the body of businessman Hiran was found 
अहिल्यानगर

हिरेननंतर उद्योजक हिरण यांचा मृतदेह सापडल्याने पोलिस अलर्ट, धागेदोरे मिळाले

अशोक निंबाळकर

अहमदनगर ः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर सापडलेल्या संशयास्पद कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्याबाबत राज्य सरकारने तपास सुरू केला आहे. याच घटनेच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात एका उद्योजकाचा असाच संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचे नाव गौतम हिरण आहे. त्याचेही अपहरण झाले होते. गेल्या आठवड्यापासून पोलिस त्यांचा तपास करीत होते. परंतु काल त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

या दोन घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी एकाच आठवड्यात झाल्या आहेत. दोन्ही उद्योजकांच्या नावात साधर्म्य आहे. श्रीरामपूरमधील उद्योजक हिरण यांच्या अपहरणाचा तपास करून आरोपींना गजाआड करावे, यासाठी आमदार लहू कानडे यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले होते.

हिरण यांची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांनीही सरकारचे लक्ष वेधले होते.

आरोपींचा सुगावा लागला

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. त्यांच्या हाती महत्त्वाचे पुरावे आणि आरोपींचा सुगावा लागला आहे. काही तरूणांना ताब्यातही घेतले आहे. या तपासात मुंबई कनेक्शन असल्याने पोलिसही अलर्ट झाले आहेत. मनसुख हिरेन आणि गौतम हिरण यांच्या हत्या झाल्या असल्या तरी त्यांची कारणे वेगवेगळी असावीत. त्यांचे केवळ नामसाधर्म्य आहे. हा निव्वळ योगायोग असावा, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. 

उद्योजक हिरण यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई कनेक्शन असण्याच्या शक्यतेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मोबाईल लोकेशनवरूनही तपास केला जात आहे. शिर्डी आणि नगर परिसरात वॉच ठेवला जात आहे. नेमकी कोणत्या कारणातून हत्या झाली आहे, या दृष्टीने पोलिसांनी तपास वळवला आहे. घरगुती कारण आहे की उद्योग व्यावसायातील काही दुष्मनी आहे, हेही पडताळून पाहिले जात आहे.

दोन दिवसांत तपास पूर्ण प्रकरण उलगडेल

दोन दिवसांत हिरण यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेतला जाईल. व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. लवकरच हे प्रकरण उलगडले आणि आरोपी गजाआड असतील.

- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, नगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT