police case filled against man giving talaq to wife over phone google
अहिल्यानगर

मोबाईलवर मेसेज पाठवून तलाक; पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा

सकाळ डिजिटल टीम


अहमदनगर : मोबाईलवर मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक (घटस्फोट) देऊन घराबाहेर काढल्याबद्दल पतीसह सासरच्या चौघा जणांविरुद्ध विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार उपनगरात ही घटना घडली असून कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खालेद ख्वाजा सय्यद याच्या भिंगारमधील तरुणीचा २०१७ मध्ये मुस्लिम धर्मानुसार विवाह झाला होता. पतीला स्टेट बॅंकेत परमनंट नोकरीसाठी सासरच्या लोकांनी १५ लाखांची मागणी केली. तरुणीच्या वडिलांनी विवाहाच्या वेळेस तीन लाख आणि नंतर दोन लाख असे एकूण पाच लाख रुपये दिले होते. सासरच्या नातेवाईकांनी राहिलेल्या पैशासाठी छळ सुरू केला. कौटुंबिक वाद मिटविणाऱ्या पोलिस दलाच्या भरोसा सेलमध्ये सामोपचाराने वाद मिटविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा छळ सुरू केला. पतीने ता.२६ ऑगस्ट रोजी मोबाईलवर तलाक असा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. त्यानंतर घरातून बाहेर काढले. या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आळंदीत इंद्रायणीच्या घाटावर छटपूजा; उत्तर भारतीयांची मोठी गर्दी

Maharashtra Crime: कीर्तन करून मठात परतले, सकाळी खोलीत आढळला महाराजांचा मृतदेह; मोबाईल गायब असल्याने गूढ वाढले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Update : उरणमध्ये प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला, धुरामुळे रहिवाशांना श्वसनाचा त्रास

Sunil Tatkare Controversy : महायुतीत वादाची ठिणगी? दळवींच्या वक्तव्याशी शिवसेनेचा संबंध नाही, तटकरेंवरील टीकेनंतर एकनाथ शिंदेंनी दिली समज; उदय सामंत यांचं मोठं विधान

Nagpur Air Pollution: पंचमीच्या फटाक्यांनी नागपूरचा श्वास कोंडला ; रामनगर, महालची हवा सर्वाधिक दूषित; पीएम २.५ चे प्रमाण ४३६ वर

SCROLL FOR NEXT