mobile  esakal
अहिल्यानगर

पोलिसांनी शोधून दिले दीड लाख किमतीचे १२ मोबाइल

निलेश पाटील

कर्जत (जि.अहमदनगर) : पोलिसांनी वर्षभरापूर्वी पूर्वी हरवलेले दीड लाख किमतीचे १२ मोबाइल शोधून कर्जतकरांना दिले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

बरोबर एक वर्षापुर्वी कर्जत पोलिस स्टेशन हद्दीत अविनाश बाळासाहेब शिंदे व गोकुळ अंकुश शिंदे, (रा. कर्जत) महादेव संजीवन अगवण, (रा.खेड), राम भगवान महारनवर, (रा. पाटेगाव), राजेंद्र बबन सावंत,(रा. शिरपूर), सोहेल रियाज मुंडे, (रा. राशीन), नवनाथ त्रिंबक मोरे, (रा.खेड) (ता.कर्जत), करण दत्तात्रय चव्हाण, (रा. राशीन), दत्तात्रय मारुती जाधव, (रा.शिंदा), विशाल तानाजी पावणे, (रा. जळकेवाडी), संघपाल संतोष कांबळे, (रा. राशीन) व गणेश गाढवे यांचे मोबाईल हरवले होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी कसोशीने प्रयत्न करून हरवलेले मोबाइल त्यांना परत मिळुन दिले आहेत. याकामी अहमदनगर मोबाईल सेलची त्यांना मदत झाली.

मोबाईल मिळालेले नागरिक आनंदी झाले त्यांनी कर्जत पोलिसांचे आभार मानले आहेत.सदर कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,कर्जत चे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस श्याम जाधव, अमित बर्डे, पांडुरंग भांडवलकर सुनिल खैरे, नगर मोबाईल सेल चे प्रशांत राठोड यांनी बजावली आहे.

मोबाईल चोरीला गेला अथवा हरवल्यास तात्काळ नजीक च्या पोलीस दुरक्षेत्र अथवा पोलीस स्थानकाशी संपर्क साधा.मोबाईल जपणे गरजेचे आहे सिम कार्डचा गैरवापर होऊ शकतो या बाबत दक्षता घ्यावी - चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक, कर्जत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

NEET Success Story: पंक्चर काढणाऱ्या वडिलांचा मुलगा डॉक्टर होणार! साहिलने नीटमध्ये मिळवले ५३० गुण; संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

'महाराष्ट्र माझी जन्मभूमी' म्हणत राणी मुखर्जीनं मराठीत केली भाषणाची सुरुवात, हिरव्या साडीतील मराठमोळ्या लूकने जिंकली मनं; Viral Video

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

SCROLL FOR NEXT