Police Inspector Sambhaji Gaikwad has said that those who harass girls will not be spared : 
अहिल्यानगर

मुलींची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही

वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : कोणी महिला व मुलींची छेडछाड करत असेल किंवा त्रास देत असेल तर तो कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही. मुली व महिलांनी न घाबरता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी; तक्रारदाराचे नाव 'गुप्त' ठेवून ताबडतोब योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही आणि विश्वास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिला. जामखेड महाविद्यालयात महिला दिनाच्या निमित्ताने अयोजित कार्यक्रमात सुरक्षितता मुलींची अन् महिलांची कर्तव्य समाजातील व्यक्तीचे या आशयाला धरुन पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड बोलते झाले. यावेळी त्यांनी रोडरोमीयोंना चांगलाच 'दम' भरला आणि विद्यार्थीनींची हिंमत वाढवली.

यावेळी पुढे श्री. गायकवाड म्हणाले, कोणत्याही महिला व मुलींना घरातील किंवा जवळच्या नात्यातील नातेवाईक, आपल्या गावात, बसस्थानक, रस्त्याने ये-जा करत असताना किंवा शाळा कॉलेजमध्ये कोणीही कसल्याही प्रकारचा त्रास देत असेल तर पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष येऊन, किंवा ०२४२१-२२१०३३ मोबाईल क्रमांक 94226 44090 या नंबरवर तक्रार करावी किंवा टेक्स्ट मेसेज, व्हाट्सअप मेसेज पाठवला तरी त्या तक्रारीची त्वरीत दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच काही तक्रार करणाऱ्या मुली किंवा महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असा विश्वास दिला. तसेच यापुर्वीही वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयात जाऊन पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांना देण्यात आला आहे.

जामखेड महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित जागतिक महिला दिनी मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी व संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश फलके, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग तसेच ७० ते ८० विद्यार्थीनीं यावेळी उपस्थित होत्या. तसेच विद्यार्थीनींही शाळा काॅलेजमध्ये येताना बाहेरचे कोणी सोबत आणू नये. आपल्या तक्रारींवर कारवाई नक्की केली जाईल. यावेळी प्रिन्सिपॉल फाळके व इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

दरम्यान  जामखेड पोलीस स्टेशन येथेही महिला दक्षता कमिटी सदस्य, इतर प्रतिष्ठीत महिला पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस अंमलदार यांची बैठक घेण्यात आली. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तसेस मिटींग दरम्यान उपस्थित सर्व महिला कमिटी सदस्य, प्रतिष्ठीत महिला, पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अंमलदार यांना छोटीसी भेट व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. दक्षता समिती सदस्य व पोलीस स्टेशन मधील महिला कर्मचारी उपस्थितीत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT