BJP-Gopichand-Padalkar esakal
अहिल्यानगर

बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, पडळकरांना रोखलं

चौंडीत प्रवेश करण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी रोखले आहे.

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर कोली आहे. पडळकर यांना पोलिसांनी रोखल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सदरील प्रतिक्रिया दिली आहे. जिल्ह्यातील चौंडी (ता.कर्जत) येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवारी (ता.३१) कार्यक्रम होत आहे. दरम्यान एक नाट्यपूर्ण घटना घडली आहे.

चौंडीत प्रवेश करण्यापासून भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी रोखले आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रसंगी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

चौंडी येथे अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होत आहे. येथे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत जयंतीनिमित्त येत होते. त्यांच्या वाहनांचा ताफा अडवला. त्यामुळे संतप्त झालेल्या खोत व पोलिसांदरम्यान वाद झाल्याचा पाहायला मिळाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देत निषेध केला. मी यात्रेवर ठाम असून शरद पवार हे त्यांच्या नातवाला लाँच करण्यासाठी अहिल्याबाईंच्या धर्मस्थळाचे राजकारण करत असल्याचा आरोप पडळकर यांनी या प्रसंगी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

Vasai News: भयंकर! भटक्या कुत्र्यांच्या टोळीचा तरुणीवर जीवघेणा हल्ला, थरारक सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवडमधील तालेरा हॉस्पिटलमध्ये गॅस गळती,परिसरात भीतीचे वातावरण

Raj Thackeray : कोचिंग क्लास हा शिक्षणापेक्षा धंदा! कॉलेजची फी 20 हजार, क्लासची 1 लाख; राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT