police esakal
अहिल्यानगर

राहुरीत पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या; 8 घरफोड्या भोवल्या

सकाळ डिजिटल टीम

राहुरी (जि. अहमदनगर) : देवळाली प्रवरा येथील घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटले. आढावा बैठकीत आमदार लहू कानडे व पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. पोलिसांच्या गस्तीपथकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आमदार कानडे यांनी खडे बोल सुनावले. देवळाली प्रवरा दूरक्षेत्राच्या पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली. त्याची पोलिस उपअधीक्षक मिटके यांनी गंभीर दखल घेतली, देवळाली प्रवरा येथे शनिवारी (ता. १७) मध्यरात्री सात-आठ चोरट्यांच्या टोळीने तब्बल चार तास धुमाकूळ घातला. आठ ठिकाणी घरफोड्या झाल्या. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. आज (शुक्रवारी) देवळाली प्रवरा दूरक्षेत्रातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तालुक्यांतर्गत बदल्या तडकाफडकी करण्यात आल्या. (Police-transfers-in-Rahuri-marathi-news-jpd93)

तालुक्यांतर्गत तडकाफडकी बदल्या

तसेच पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, सहायक उपनिरीक्षक पोपट टिक्कल, पोलिस नाईक जानकीराम खेमनर, गणेश फाटक, अमोल पडोळे, किरण ठोंबरे यांची त्यांनी तडकाफडकी बदली केली. तसेच पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ, पोलिस नाईक, वैभव साळवे, कॉन्स्टेबल सुरेश भिसे, महेंद्र गुंजाळ, सागर माळी, शहामद शेख यांची नियुक्ती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT