Police warned to take action if peace is disturbed during elections 
अहिल्यानगर

गाव म्हणजे एक मोठे कुटुंब, निवडणुकीत शांततेचा भंग केल्यास कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : गाव म्हणजे एक मोठे कुटुंब असुन सर्वांनी सण- उत्सवासह निवडणूकीच्या काळात शांततेचा भंग होणार नाही. याची काळजी घ्यावी, अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी दिला आहे. 

श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोपाणी यांनी बेलापुर पोलिस चौकीसमोर विविध पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. घटनेची चौकट आणि कायद्याच्या चाकोरीत राहून काम करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतू ते सोडून कोणी व्यक्ती निवडणूक प्रक्रियेत बाधा आणुन समाजघातक कृत्य करीत असेल तर तातडीने पोलिसांना कळवा पोलिस संबधीतांवर तात्काळ कडक कारवाई करणार आहे.

बैठकीला जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, बाजार समिती संचालक सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके, देविदास देसाई, सुनील मुथा, रविंद्र खटोड, पोलीस पाटील अशोक प्रधान यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde:'विधान परिषदेत शशिकांत शिंदेंचा पेन ड्राइव्ह बॉम्ब'; कोरेगावच्या पोलिस अधिकाऱ्याची संभाषण क्लिपने उडाली खळबळ..

Mumbai: हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय! अवाजवी मेंटेनन्स आणि वाढीव वीजबिलावर लगाम लागणार; सरकारची मोठी घोषणा

Sydney Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनीत दहशतवादी हल्ला? दोन अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार; १० जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update: ओबीसी आंदोलक अँड.मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक

Crime: आधी अमानुष मारहाण; नंतर जीवे मारण्याची धमकी, शिक्षकाचं ७ वीच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कारण काय?

SCROLL FOR NEXT